Tuesday, May 21, 2024

दिशाचे मिस्ट्रीमॅनसोबतचे तसले फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, ‘टायगर अभी जिंदा है’

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडे दिशा टायगर श्रॉफ सोबत ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिली होती, आणि आता ती एका अनोळखी व्यक्तीसासोबत स्पॉट झाली आहे. त्या व्यक्तीसोबत दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दिशाच्या या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

वास्तविक, दिशा पटानी (Disha Patani) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत ब्रेकअ झाल्यामुळे सतत चर्चेत होती, आणि आता ती अनोळखी व्यक्तीसोबत दिसत आहे. गेल्या आठवड्यात, दिशा या अनोळखी व्यक्तीसोबत डिनरसाठी बाहेर जाताना दिसली होती, त्यामुळे आता तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. दिशाला अनोळखी माणसासोबत पाहून चाहते खूश झाले नाहीत आणि टायगर श्रॉफबद्दल (Tiger Shroff) विचारणा करत कमेंट करत आहेत.

एका यूजरने लिहिले, ‘मित्र की बॉयफ्रेंड’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘टायगर भाई कुठे आहे?’ त्याचवेळी एका अन्यने लिहिले, ‘या मॅडम आता टायगरला फसवत आहेत’, तर , ‘बघतोय बिनोद हे लोक फ्रेंडला त्यांचा बॉयफ्रेंड म्हणून सांगतात.’ याशिवाय दिशा आणि तिच्यासोबत दिसणार्‍या अनोळखी माणसाबद्दलही अनेकजण बोलत आहेत. या अनोळखी माणसामुळे टायगर आणि दिशाचे ब्रेकअप झाले का ? असा सवालही त्यांनी केला.

 

View this post on Instagram

 

वास्तविक, दिशा पटानीसोबतचा अनोळखी माणूस दुसरा कोणी नसून तिचा ट्रेनर अलेक्झांडर अॅलेक्स इलिक आहे, जो एक महत्त्वाकांक्षी अभिनेता-मॉडेल देखील आहे. अॅलेक्ससोबत अभिनेत्रीचे फोटोही विविध सोशल मीडिया हँडल्सवर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अलेक्ससोबत दिशाचे एक नाही तर अनेक फोटो आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते असा प्रश्नही विचारत आहेत की, टायगर आणि दिशाचे ब्रेकअप तर झाले नाही ना?

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
लेक आयराच्या साखरुपुड्यात बेधुंद थिरकला आमिर खान, पहा व्हायरल व्हिडिओ
ईशा गुप्ताच्या बाेल्डनेसचा कहर! फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा