Tuesday, May 21, 2024

लेक आयराच्या साखरुपुड्यात बेधुंद थिरकला आमिर खान, पहा व्हायरल व्हिडिओ

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या सातव्या आसमाणवर आहे. त्याने . मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची मुलगी आयरा खान हिचा (दि, 18 नोव्हेंबर) रोजी तिचा साखरपुडा पार पडला. त्यामुळे अभिनेत्याच्या आनंदाला ठिकाणाच उरला नाही.

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Amir Khan) याची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने नुकंतच आपला बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupoor Shikhare) याच्यासोबत साखरपुडा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीने प्रेकांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी या जोडीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये नुपुरने आयराला फिल्मी स्टाइलने प्रपोज केले होते. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. आता पुन्हा एकदा या जोडीने गुपचुप साखरपुडा करुन अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आयराच्या साखपुड्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. इराने साखरपुड्यामध्ये लाल रंगाचा शोल्डरलेस गाउन घातला होता आणि नुपुरने काळ्या रंगाचा सुट बुट परिधान केला होता. पार्टीच्या अनेक व्हिडिओपैकी आमिर खानच्या व्हिडिओने सोशल मीडियावर क्रेज मिळवली आहे. यामध्ये आमिर बेभान होऊन थिरकताना दिसून येत आहे. (Aamir Khan Dance video from daughter ira khan engagement)

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमिर खान मुलगी इराच्या साखरपुड्यामध्ये ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ या गाण्यावर त्याने धमाकेदार डान्स केला आहे. हे कयामत से कयामत तक चित्रपटातील गाणं असून या गाण्यावर आमिरने धमाकेदार डान्स केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करत आहे. जेव्हा आमिर ‘पापा कहते है’ या गाण्यावर डान्स करतो तेव्हा इरा खान देखिल त्याला चिअर करत ड्रिंकचा ग्लास घेऊन नाचते. या व्हिडिओमध्ये आमिर पांढऱ्या रंगाच्या पंजाबी कुरत्यामध्ये दिसत आहे. त्याची पांढरी दाढी त्याच्या लुकला कंपलीट करत आसून, अभिनेता खूपच हॅन्डसम दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
ईशा गुप्ताच्या बाेल्डनेसचा कहर! फाेटाे व्हायरल
बिचारा अब्दु! बिग बॉसच्या घरात निमरित कौरच्या बॉयफ्रेंडची एंट्री…

हे देखील वाचा