बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिशा पटानी अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेसचीही विशेष काळजी घेत असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमूळे ती बऱ्याचदा चर्चेचा विषयही बनते.
नुकताच अभिनेत्री दिशा पटानीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांसमवेत प्रियकर टायगर श्रॉफलाही वेड लावले आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिशा बॅकफ्लिप करताना दिसली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांनाही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहात आहेत. दिशाची हा व्हिडीओ पाहून टायगर श्रॉफ देखील चकित झाला.
अभिनेत्रीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या जिम प्रशिक्षकासह बॅकफ्लिप मारताना दिसत आहे. दिशाने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘#वुईईई’
(#wuiiiii). या पोस्टवर कमेंट देताना तिचा प्रियकर टायगर श्रॉफने लिहिले आहे, “व्वा, माझी इच्छा आहे की मीही हे करू शकू.” टायगर श्रॉफची कमेंट पाहून सुझान खानने कमेंट केली की, “तुम्ही दोघेही उत्कृष्ट आहात.” तसेच, कोरिओग्राफर राहुल शेट्टीनीही त्यांना ”खतम” अशी गमतीदार प्रतिक्रिया दिली.
दिशा पटानी लवकरच आगामी चित्रपट ‘राधे’मध्ये दिसणार आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत असणार आहे. यावर्षी ईद 2021 च्या निमित्ताने हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच, दिशा दुसऱ्यांदा सलमान खानसोबत चित्रपट करत आहे.










