Monday, July 1, 2024

दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

दिशा पटानी ही बॉलिवूडच्या सर्वाधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. जो तो तिच्या अदांचा दीवाणा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. यामुळेच तिचे फोटो समोर येताच, ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. दिशाची सोशल मीडिया फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. अशामध्ये तिने पुन्हा एकदा आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

दिशाचा दिलकश अंदाज
दिशा पटानीने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा अतिशय हॉट ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणे अप्रतिम दिसत आहे. अभिनेत्रीने या ड्रेससोबत कोणतेही दागिने घातलेले नाहीत. तर यात तिने न्यूड मेकअप केला आहे. या फोटोमध्ये, तिने घातलेला ड्रेसच तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे. हा ड्रेस घालून तिने फ्लोरवर बसून फोटोसाठी एक सुंदर पोझ दिली आहे. (disha patani shared a beautiful photo tiger shroff comment gone viral)

स्वत: ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
दिशा पटानीची सुंदरता पाहून टायगरही स्वतःला रोखू शकला नाही. अभिनेत्याने तिच्या पोस्टवर फायर, स्मायली आणि हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. चाहत्यांनाही दिशा आणि टायगरची जोडी खूप आवडते. महत्त्वाचे म्हणजे या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

आगामी चित्रपट
दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यावसायिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अलिकडेच सलमान खानसोबत ‘राधे’ चित्रपटात दिसली होती. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शिवाय आता ती लवकरच ‘एक व्हिलन २’ मध्ये जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा