×

‘बॅग आहे का माचीसचा डबा!’, दिशा पटानीची हॅन्ड-बॅग पाहून चक्रावले नेटकरी, विचारले ‘असे’ प्रश्न

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याच्या आगामी ‘हिरोपंती २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर याचदरम्यान त्याची कथित गर्लफ्रेंडही चर्चेत आली आहे. अलीकडेच टायगरच्या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती आणि यात दिशा पटानीही दिशा पटानी (Disha Patani) होती. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दिशाचा व्हिडिओ व्हायरल
टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हिरोपंती २’ आज चित्रपटगृहात दाखल होणार आहे. टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण टायगर श्रॉफने याच्या पहिल्या भागातूनच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. ‘हीरोपंती २’मध्ये तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काल रात्री मुंबईत ‘हिरोपंती २’चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी टायगर श्रॉफचा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी आले होते. ‘हिरोपंती २’च्या स्क्रीनिंगवेळी टायगर श्रॉफची खास मैत्रीण दिशा पटानीही दिसली होती. स्क्रीनिंगमधून दिशा पटानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (disha patani took a small bag at heropanti 2 special screening)

विचित्र बॅग घेऊन दिसली दिशा
दिशा पटानी ‘हिरोपंती २’च्या स्क्रीनिंगमध्ये फिकट जांभळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, दिशा स्क्रीनिंगपूर्वी मीडिया पॅपराझींसमोर जबरदस्त पोझ देताना दिसली. हा व्हिडिओ पाहून अनेकांचं लक्ष दिशा पटानीच्या हॅन्ड बॅगकडे गेलं आणि मग काय! दिशा पटनीच्या नवीन व्हिडिओवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

खरं तर यावेळी दिशा पटानी एक अतिशय छोटी बॅग घेऊन आलेली दिसली. दिशा पटनीच्या या बॅगच्या आकाराची बरीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट केली आहे की, “मला हे विचार करून आश्चर्य वाटते की दिशा या बॅगेत काय ठेवेल?” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “या बॅगेत काय ठेवले आहे?”

टायगरच्या खूप जवळ आहे दिशा
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या अफेअरची बरीच चर्चा असते. या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. गेल्या महिन्यात टायगर श्रॉफच्या वाढदिवशी दिशा पटानीने त्याचे खास अभिनंदन केले होते आणि त्याला आपला चांगला मित्रही म्हटले होते. तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपचीही बरीच चर्चा होती. मात्र दोघेही पूर्वीप्रमाणेच प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post