×

दिशा पटानी उचलले ८० किलोचे वजन, टायगर श्रॉफच्या बहिणीसोबत आईनेही केले तोंड भरून कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी एक फिटनेस फ्रिक आहे. ती नेहमीच तिचे वर्क आउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आणि व्हिडिओ आवडत असतात. तसेच अनेकांना तिच्या या पोस्टमुळे प्रेरणा मिळते. अशातच तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दिशा पटानीने (disha patani) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती अनेक बॉलिवूड कलाकाराला टक्कर देईल असे वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती ८० किलोचे वजन उचलून ६ रॅक पुल करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील हैराण झाले आहेत. ( Disha patani weight lift video, tiger Shroff sister Krishna reacts)

दिशा पटानीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहते सगळ्यात सुंदर अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक यांसारख्या कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “रॅक पुल ५, रेप्स ८० केजी” तिच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांच्या देखील कमेंट येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

दिशाच्या‌‌ या व्हिडिओवर टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने फायर ईमोजी पोस्ट करून लिहिले आहे की, “यू आर फायर.” तसेच टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफने “बीट,” असे लिहिले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

दिशा पटानी नेहमीच तिचे व्हिडिओ शेअर करत असते. यात ती सहजतेने वजन उचलताना दिसत असते. ती फ्लाइंग किक देखील खूप छान करते. या आधी तिने जो व्हिडिओ शेअर केला होता, त्यात ती फ्लाईंग किक मारताना दिसत होती.

हेही वाचा :

Happy Birthday : एक चूक पडली महागात आणि जिया मानेकला सोडावी लागली ‘साथ निभाना साथीया’ मालिका

Birth anniversary : असे काय झाले होते की, निम्मी ओळखल्या जात होत्या ‘अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’

Bappi Lahiri | कसे झाले बप्पी लहरी यांचे निधन? जावयाने सांगितला ‘त्या’ रात्रीचा पूर्ण घटनाक्रम

Latest Post