Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘नाहीतर आम्हालाही आत्महत्या करावी लागेल’, दिशा सालियानच्या आई- वडिलांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र

‘नाहीतर आम्हालाही आत्महत्या करावी लागेल’, दिशा सालियानच्या आई- वडिलांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushant singh Rajput) मृत्यूबद्दलचा वाद पुन्हा एकदा वर आला आहे. कारण सुशांत सिंगची मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) आईवडिलांनी राष्ट्रपतींना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात दिशा सालियानच्या बदनामीबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. 

१४ जून २०२०ला अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने सगळीकडे खळबळ माजली होती. अनेकांनी सुशांत सिंगच्या या मृत्यूवर संशय व्यक्त करत हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. या प्रकरणाने देशभर अनेक महिने जोरदार चर्चा रंगली होती. तत्पुर्वी सुशांत सिंंगच्या मृत्यूआधी म्हणजेच ८ जूनला दिशा सालियनने आत्महत्या केली होती. हाच धागा पकडत नारायण राणे यांनी अनेक आरोप केले होते. आता या विरोधात दिशा सालियानच्या आई वडिलांनी तक्रार केली आहे.

या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिले की, “आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर आमचे आयुष्य अस्ताव्यस्त झाले आहे. अशा परिस्थितीत नारायण राणे आणि त्यांच्या लोकांकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या खूप त्रासदायक आहेत. आम्ही तक्रारी दाखल करुनही राणे आणि त्यांच्या मुलांनी आमचे नाव खराब करणे थांबवले नाही. असे वाटते की, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. कारण खोट्या बातम्या पसरवणे, हा आमच्या सुखी आयुष्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा आहे.” अशा शब्दात दिशाच्या आई वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच राष्ट्रपतींंनी आम्हाला न्याय द्यावा नाहीतर, आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नसेल, असाही इशारा दिशाच्या आई वडिलांनी दिला आहे.

दरम्यान दिशाच्या आईने कलम ५००, ५०९ आणि माहिती अधिकार कायदा कलम ६७ च्या अधिनियमात हा गुन्हा नोंद केला होता. या तक्रारीमध्ये दिशाच्या आईने अभिनेता सुशांत सिंगबद्दल बोलताना नेत्यांनी त्यांच्या मुलीला बदनाम केल्याचे म्हटले आहे. याआधी दिशा सालियान प्रकरणात महाराष्ट्राचे भाजपा नेते नितेश राणे ६ मार्चला मुंबई पोलिसांना शरण गेले होते. दिशा सालियान प्रकरणात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा