×

‘आत्महत्या नव्हे, तर हत्या!’ सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर नारायण राणेंचा धक्कादायक गौप्यस्फोट, सादर केले पुरावे

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूने अवघ्या चित्रपट जगतात खळबळ माजली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने आत्महत्या का केली असावी हाच प्रश्न पडला होता. सुशांतच्या आत्महत्येवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उभे करत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा खुलासा केला होता. हा वाद कित्येक महिने चालू होता. आता यावर महाराष्ट्राचे दिग्गज भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूवर अनेक राजकीय नेत्यांनी शंका व्यक्त केली होती. आता या प्रकरणावर दिग्गज भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत राणे यांनी सुशांत सिंगची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले की, “८ जून २०२०ला सुशांत सिंगची मॅनेजर दिशा सालियनवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या पार्टीला येण्यासाठी दिशा तयार नव्हती मात्र तिला जबरदस्तीने बोलावून तिच्यावर आधी बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर हत्या करण्यात आली. ज्या बिल्डींगमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही आठ जूनपर्यंत ठीक होते. मात्र १३ जूनलाच सीसीटीव्ही अचानक बंद कसे काय झाले? या इमारतीत येणार्‍या जाणार्‍यांची नोंद असलेले रजिस्टर सुद्धा अचानक कसे काय गहाळ झाले.”

याबद्दल पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, “आपल्या मॅनेजरचा मृत्यू झाला आहे हे सुशांतला माहीत होते. यासंबंधीत अनेक खुलासे तो करणार होता. याच भीतीने त्याची हत्या करण्यात आली. त्यादिवशी सुशांतच्या घरी एक लाल दिव्याची गाडी आली. त्यातून आलेल्या चार लोकांनी त्याला मारले. फक्त सुशांतच नव्हे, तर यामध्ये अनेकांची हत्या केली गेली आहे. सुशांतचा रॉय नावाचा मित्रसुद्धा गायब आहे, त्याच्या घरचा नोकर सावंत आणि वॉचमन सुद्धा गायब आहे. हे सगळे कुठे गेले?” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नारायण राणे यांच्या या सगळ्या खुलाशाने सुशांत सिंग राजपूत प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post