बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर त्याची व्यवस्थापकीय मॅनेजर दिशा सालियान हिचा (दि 8 जून 2020) रोजी मध्यरात्री मुंबईतील मलाड येथील आपल्या राहत्या घरी गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अवघ्या 28 व्या वयातच आपला जीव गमावला होता. मात्र, सीबीआयने या मृतदेहाला अपघाती मृत्यू असा निष्कर्ष काढला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार मुंबई टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान (disha salian) हिचा राहत्याघरी 8 जूनच्य मध्यारात्रीला मुंईमधील मलाड गॅलेक्सी रीजेंटच्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. द इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सुशांतची मॅनेजर दिशा हिच्या मृत्यूची सीबीआयने तपासनी केल्यानंतर मृत्यू अपघात आहे असा निष्कर्ष लावण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अवघ्या पाच दिवासातच दिशाचा मृत्यू झाला होता.
दिशा (दि, 8 जून 2020) रोजी दारुच्या नशेत होती, अचानक तिचा तोल जाऊन ती 14 व्या मजल्यावरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. अशी माहिती सीबीआयने दिली होती. सीबीआय संस्थेने दिशाच्या मृत्यूचा निकाल स्वतंत्रपणे दाखल केला नसाला, तरी सुशांतच्या मृत्यूतपासादरम्यान त्यांनी हे प्रकरणही उलगडले होते.
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर या प्रकरणामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा आणि सुशांत या दोन्ही मृत्यूचा काहीतरी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता, कारण दिशा आणि सुशांत यांनी एकत्र काही काळ काम केले होते. यानंतर तिच्या मृत्यूबद्दल सखोल माहीतीदेखिल काढण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकार मुलाखतीदरम्या सांगितले होते की, “दिशाने आपल्या वाढदिवसानिमित्त रहात्या घरी एक पार्टी ठेवली होती. त्याच मध्यरात्री तिने जास्त दारु पिल्यामुळे दिशाचा तोल गेला आणि ती फ्लॅटच्या पॅरापेटवरुन घसरली.” असं अधिकाऱ्यांनी तपास निष्कर्षामध्ये सांतिला.
सीबीआयने या मृत्यूप्रकरणी सखोल माहिती गोळा करुन तिच्या मृत्यूला अपघात मृत्यू असा निष्कर्ष लावला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सुशांत राजपूत एक प्रतिभावंतर कलाकार…’,म्हणत, शरद केळकरने व्यक्त केल्या भावना
समंथाच्या अगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होता नागा चैतन्य, तर ‘असा’ होता त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास