Sunday, May 19, 2024

समंथाच्या अगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होता नागा चैतन्य, तर ‘असा’ होता त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ज्याने त्याच्या अभिनयाने सर्वत्र नाव कमावले आहे, तो म्हणजे अभिनेता नागा चैतन्य. साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यने देखील चित्रपटात काम करून त्याचे वेगळे नाव कमावले आहे. त्याचे चाहते संपूर्ण देशात पसरले आहेत. त्याची कोणतीही भूमिका असो ती प्रेक्षकांना खूप आवडत असते. अशातच गुरूवारी (23 नोव्हेंबर) नागा चैतन्य त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी…

नागा चैतन्यचा जन्म 23 नोव्हेंबर 1986 रोजी हैदराबाद येथे झाला. तो कॉलेजमध्ये असताना त्याच्या वडिलांनी तो अभिनेता बनावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याने मुंबई आणि लॉस एंजेलिसमध्ये अभिनयाचे धडे घेतले. त्याने 2010 मध्ये ‘जोश’, या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटातून त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या. त्याने ‘100% लव्ह’, ‘मनाम’, ‘प्रमेम’, ‘लव्ह स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. (Sauth actor naga Chaitanya celebrate his birthday, let’s know about his life)

चित्रपटात काम करताना त्याची ओळख अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिच्याशी झाली. त्यानंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. त्यांनी 2017 मध्ये साखरपुडा केला आणि त्याच वर्षी गोव्यामध्ये जास्त कोणाला कल्पना न देता लग्न देखील केले. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नात केवळ त्यांच्या जवळचे काही मित्र आणि कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. परंतु या वर्षी म्हणजेच2021 मध्ये त्यांनी त्यांनी त्यांच्या नात्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर ते दोघीही खूप चर्चेत होते. माध्यमातील वृत्तानुसार समंथासोबत लग्न करण्याआधी तो अभिनेत्री श्रुती हासनसोबत रिलेशनमध्ये होता. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाले होते.

नागा चैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. तो आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्डा’ ,या चित्रपटात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला या चित्रपटात बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा-
‘या’ दिवशी ‘मुसाफिर’ घडवणार मैत्रीची सुंदर सफर; दिमाखदार सोहळ्यात पोस्टरचे अनावरण
समंथाला भेटल्यावर नागा चैतन्या करणार ‘हे’ काम, अभिनेत्याने केला खुलासा

हे देखील वाचा