टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही आज घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या निखळ अभिनयामुळे आज प्रेक्षकांच्या जीवनातील थोडा काळ तरी आनंदमय जात असतो. मालिकेतील प्रत्येक पात्राचे एक वेगळेच कौशल्य पाहण्यास मिळते. हा शो म्हणजे मनोरंजनाचा खजिना असून, मालिकेतील प्रत्येक पात्र अत्यंत उत्तमरीत्या रेखाटले गेले आहे. यातील आपल्या आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात नेणारे पात्र म्हणजे दया बेन. हे पात्र बरेच वर्ष अभिनेत्री दिशा वकानी हिने निभावले आहे.
मालिकेतील तिचे कॉमेडी टाईमिंग, तिचा आवाज आणि भाषा नेहमीच सर्वांना खूप आवडते. दिशा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दया बेनच्या वेशात दिसत असून, ती काही डायलॉग म्हणताना दिसत आहे. तर दुसरीकडे एक लहान नऊ वर्षाची मुलगी तिच्याप्रमाणे साडी नेसून तिचा अभिनय करताना दिसत आहे. (actress disha vakani share a video on social media)
हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आमची ९ वर्षाची छोटी दयाबेन कशी वाटली?” तिने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच ही लहान दयाबेन देखील सर्वांना खूप आवडली आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून या लहान मुलीचे कौतुक करत आहेत.
दिशाने २०१७ मध्ये मॅटर्निटी लिव्ह घेऊन या मालिकेमधून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर ती अजूनही या मालिकेत परत आलेली नाही. ‘हे मा माताजी’ आणि ‘टप्पू के पापा’ यांसारखे डायलॉग बोलून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दिशा वकानीला सगळे प्रेक्षक खूप मिस करत आहेत. मागील काही दिवसापूर्वी ती या शोमध्ये परत येणार आहे. अशा बातम्या येत होत्या. परंतु मालिकेत तिचे आगमन न झाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. त्यावेळी निर्मात्यांनी सांगितले होते की, ती एका एपिसोडसाठी खूप जास्त मानधन मागत आहे. जे मालिकेला परवडत नाही. त्यानंतर दयाबेन हे पात्र साकारण्यासाठी अनेक अभिनेत्रीची नावे समोर आली होती. परंतु तिच्यासारखे मनोरंजन करायला अभिनेत्री अयशस्वी झाल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…
–बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास