Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ मराठी अभिनेत्यांनाही करावा लागलाय घटस्पोटाचा सामना

प्रेम, लग्न प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो, त्यामुळेच लग्नसोहळा हा प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो बरोबर ना, पण जेव्हा एखादवेळी प्रेम संपते, नाते संपते, त्यावेळी मात्र त्रासही होतो. बरं या भावना काही फक्त सामन्य माणसंच अनुभवतात असं नाही, तर सेलिब्रिटीही या भावनांमधून जातात. काहींचे लग्न आयुष्यभर टिकते, तर काही जोडपी अशी असतात, ज्यांचे लग्नानंतर पटत नाही आणि ते मग आपल्या चांगल्या भविष्यासाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. मराठी इंडस्ट्रीमधील देखील अशी काही जोडपी आहेत, ज्यांनी घटस्पोट घेतला आहे, कोण आहेत ही जोडपी चला जाणून घेऊया

‘हम आपके है कौन’ मधून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रेणूका शहाणे. (renuka shahane) सर्वांना जवळपास माहिती आहे की तिने आशितोष राणा यांच्याशी लग्न केले आहे. पण खूप लोकांना हे माहितये की, आशितोष राणा यांच्याशी लग्न करण्यासाठी रेणूका यांचे मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक विजय केंकरे यांच्याशी लग्न झाले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांनी घटस्पोट घेतला.

आज मराठी, हिंदी इंडस्ट्रीतील मोठे नाव असणारे दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर. (mahesh manjrekar)पण त्यांचाही यापूर्वी एकदा घटस्पोट झाला आहे. महेश मांजरेकर यांनी पहिलं लग्न कॉस्चूम डिझायनर दिपा मेहता बरोबर झाले होते. त्यांना सत्या आणि आश्वमी ही दोन मुलंही आहेत. पण दिपा मेहताबरोबर घटस्पोट घेतल्यानंतर महेश मांजरेकर यांनी मेधा मांजरेकर बरोबर संसार थाटला. त्यांना सई ही मुलगी असून, मेधा यांना पहिल्या लग्नापासूनही गौरी नावाची एक मुलगी आहे.

या यादीत स्वप्नील जोशीही आहे. त्याचेही दोनवेळा लग्न झाले आहे. स्वप्नीलने 2005 मध्ये आपली मैत्रीण अपर्णाशी लग्न केले होते. ती डेंटिस्ट होती. पण केवळ चारच वर्षांत ते वेगळे झाले. त्यानंतर स्वप्नीलने २०११ मध्ये डेंटिस्टच असलेल्या लिना आराध्या बरोबर लग्न के सई ताम्हणकर ले. त्यांना दोन मुलं आहेत.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) हिचाही घटस्पोट झाला आहे. तिने २०१३ मध्ये अमेय गोसावी याच्याशी लग्न केले होते. पण दोनच वर्षांत त्यांनी घटस्पोट घेतला. अमेय गोसावी हा व्हिज्यूअल आर्टिस्ट आहे.

अभिनेता पियुष रानडे यानेही दोन वेळा लग्न केले. त्याने २०१० मध्ये त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिच्याशी लग्न केले होते. पण चार वर्षांनी २०१४ मध्ये त्यांनी घटस्पोट घेतला. त्यानंतर अस्मिता मालिकेत काम करताना तो आणि मयुरी वाघ जवळ आले. त्यांनी २०१७ मध्ये लग्नगाठही बांधली. पण अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांचेही लग्न फार काळ टिकले नसून दोघांनी घटस्पोट घेतला आहे.

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहचलेली श्री-जान्हवीची जोडी म्हणजेच शशांक केतकर (shashank ketkar) आणि तेजश्री प्रधान. या दोघांनी ही मालिका सुरू असताना लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फक्त एक वर्षच टिकले. त्यानंतर त्यांनी घटस्पोट घेतला. शशांकने पुढे प्रियंका धावळेशी २०१७ मध्ये लग्न केले. त्यांना आता एक मुलगाही झाला आहे.

आपल्या सौंदर्याने आणि आदांनी भूरळ घालणाऱ्या स्मिता गोंदकर (smita gondkar) हिनेही घटस्पोट घेतला आहे. तिने सिद्धार्थ बंदीयाशी लग्न केले होते. पण नंतर तिने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप करत त्याच्यापासून घटस्पोट घेतला.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने तिचा लहानपणीचा मित्र भुषण बोप्चे याच्याशी २०१२ मध्ये लग्न केले होते. पण तेही फार काळ एकत्र राहिले नाही, असे असले तरी काही रिपोर्ट्सनुसार तेजस्विनीने घटस्पोट घेतला आहे की नाही याबद्दल खुलासा केलेला नाही. पण ती सध्या भुषणबरोबर राहात नाही.

बिगबॉस फेम स्नेहा वाघ (sneha vagh) हिचे आणि अभिनेता अविष्कार दार्वेकरचे लग्न झाले होते. पण स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्पोट घेतला होता. हे दोघेही घटस्पोटानंतर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिजनमध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘भूतकाळापासून धडा घेऊन बरंच काही बदललं आहे’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम मिहिर उपाध्यायचा खुलासा

कुणी म्हणतंय ‘सुपर’, तर कुणी ‘व्हेरी हॉट’, डीपनेक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसची हद्दच केली पार

कुशल बद्रिकेचा भावूक व्हिडिओ वेधतोय लक्ष, म्हणतोय; ‘आई-बाबांचं भांडण झालं अन् बाबांनी ठरवलं…’

हे देखील वाचा