Friday, July 12, 2024

महेश मांजरेकरांच्या लेकीने वाऱ्याला मागे टाकत केली भन्नाट घोडेस्वारी, व्हिडिओ झाला व्हायरल

महेश मांजरेकर बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून नेहमीच काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एक उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच ते प्रभावी अभिनेते देखील आहे. महेश मांजरेकर यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांची मुलं पुढे नेताना दिसत आहे. मांजरेकर नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. मात्र सध्या ते त्यांच्या मुलांमुळे गाजताना दिसत आहे. मुलांमुळे पालकांचे नाव व्हावे ही प्रत्येक आईवडिलांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बाब असते. यात मिळणारे सुख सध्या मांजरेकर अनुभवत आहे.

महेश मांजरेकर यांच्या लेकींनी त्यांच्या वडिलांची मान चांगलीच उंचावली आहे. एक मुलगी बॉलिवूडमध्ये नाव कमावत असताना दुसरीने मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी ‘पांघरून’ हा मांजरेकरांचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला देखील. या सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करणारी महेश मांजरेकरांची लेक अर्थात अभिनेत्री गौरी इंगवले सध्या तिच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

गौरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती घोडेस्वारी करताना दिसत आहे. गौरीचा हा व्हिडिओ पाहून तिने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत असून, तिच्या या नवीन गुणाचे तुफान कौतुक होत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आणि लाइक्स आले असून फॅन्ससोबतच कलाकार देखील तिचे कौतुक करताना दिसत आहे.

गौरीने बालकलाकार म्हणून अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात काम केले होते. गौरी ही एक उत्तम नृत्यांगना असून, ती नेहमीच तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा