टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ प्रसिद्ध जोडीचे झाले ब्रेकअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती

मनोरंजनविश्वात अशा अनेक जोड्या आहेत ज्या त्यांच्या कामापेक्षा जास्त त्यांच्या रिलेशनशिपमुळे सर्वात जास्त प्रसिद्ध होऊन गाजताना दिसतात. या जोडयांना प्रेक्षकांचे अमाप प्रेम देखील मिळते. मात्र असे असूनही यातल्या काही जोडी दुर्दैवाने वेगळ्या देखील होतात. अशीच एक जोडी म्हणजे दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद. या जोडीने नेहमीच सर्वांसमोर कपल गोल्स सेट केले. बिग बॉस ओटीटीमधून गाजलेली दिव्या आणि खतरो के खिलाडीमधून गाजलेला वरुण या दोघांना नेहमीच आदर्श कपल समजले जायचे मात्र आता या दोघांनी त्यांचे नाते तोडले असून ते वेगळे झाले आहे. याची माहिती दिव्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली.

View this post on Instagram

A post shared by Divya AmarSanjay Agarwal (@divyaagarwal_official)

वरुण आणि दिव्याच्या ब्रेकअपबद्दल दिव्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक लांबलचक पोस्ट शेअर करत तिची बाजू मांडली आहे. यासोबतच तिने हे देखील स्पष्ट केले की ती आणि वरुण नेहमीच चांगले मित्र राहतील. दिव्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आयुष्य हे एक सर्कस आहे. जे माझ्यासोबत घडले किंवा घडत आहे, त्यासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. मला वाटते की, आता सर्व संपले आहे, आणि ते योग्य देखील आहे. मी श्वास घेऊ इच्छिते आणि स्वतःसाठी जगू इच्छिते.”

View this post on Instagram

A post shared by Divya AmarSanjay Agarwal (@divyaagarwal_official)

पुढे दिव्याने लिहिले, “मी याच अधिकृत घोषणा करत आहे की, मी या जीवनात माझ्या हिंमतीवर आणि माझे जीवन माझ्या पद्धतीने जगण्यासाठी वेळ देऊ इच्छित आहे. यातून बाहेर पडणे ही माझी इच्छा आहे. मी खरंतर त्याच्यासोबत व्यतीत केलेल्या अनेक आनंदाच्या क्षणांना महत्व देते आणि प्रेम करते. तो एक चांगला मुलगा असून, नेहमीच माझा चांगला मित्र राहील. माझ्या निर्णयाचा सन्मान करा.” या पोस्टसोबतच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर देखील वरुण सूदला प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद म्हटले आहे. तिने या स्टोरीमध्ये लिहिले, “धन्यवाद वरुण, आपण नेहमीचीच चांगले मित्र राहू” दिव्याची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, फॅन्स त्यांना कमेंट्स करून वेगळे होण्याचे कारण विचारत आहे.

View this post on Instagram

A post shared by Divya AmarSanjay Agarwal (@divyaagarwal_official)

दिव्या आणि वरुणच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या फॅन्स खूपच निराश झाले आहे. अनेकांनी तिला सांत्वना दिली आहे, तर अनेकांनी त्यांच्या ब्रेकअपचे कारण विचारले आहे. दिव्याच्या या पोस्टवर अजून वरुणची कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये. वरुण आणि दिव्या मागील अनेक काळापासून सोबत होते. वरुणने दिव्याला या रियॅलिटी शोमध्ये प्रपोज केले होते.

Latest Post