बलात्काराचा आरोप असणाऱ्या अभिनेता पर्ल पुरीवर दिव्या खोसलाने दिली प्रतिक्रिया: म्हणाली, ‘तो नेहमीच स्त्रियांकडे…’

divya khosla kumar supports pearl v puri


सध्या मनोरंजनसृष्टीचा वक्र काळ सुरु आहे. कोरोनामुळे आधीच ही ग्लॅमर इंडस्ट्री संकटात असताना, दुसरीकडे कलाकार देखील वेगवेगळ्या समस्यांचा सामना करताना दिसत आहे. कलाकार हे नेहमीच समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ठरले आहे. समाजाचा महत्वाचा हिस्सा म्हणून कलाकरांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळते. कलाकरांना त्यांचे लाखो फॅन्स फॉलो करत असतात, मात्र असे असूनही कलाकारांच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्याकडून अनेक लहान मोठ्या चुका, कधी कधी तर गुन्हा देखील घडतो.

नुकतीच टेलिव्हिजन क्षेत्राला हादरवणारी एक मोठी घटना घडल्याचे समोर आले आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्ल पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेला विरोध आणि पर्लला समर्थन करण्यासाठी मनोरंजन क्षेत्रात दोन गट तयार झाले आहेत. एकता कपूरसह अनेक कलाकारांनी पर्लला पाठिंबा देत तो निर्दोष असल्याचे सांगितले आहे तर, दुसरीकडे काही कलाकारांनी पर्लच्या विरोधातही वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री दिव्या खोसलाने देखील पर्लला पाठिंबा देण्यासाठी एक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. यात तिने लिहिले आहे की, ” एक पवित्र आत्मा जो नेहमीच स्त्रियांना आदराने बघतो.” सोबतच तिने आयस्टॅन्डविथपर्ल आणि पर्लवीपुरी हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत. सोबतच दिव्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या घटनेची संपूर्ण माहिती देखील दिली आहे. दिव्याने आणि पर्लने ‘तेरी आंखो मैं’ गाण्यात एकत्र काम केले आहे.

डीसीपी संजय कुमार पाटील यांनी पर्लला पाठिंबा देणाऱ्या सर्व कलाकरांना सांगितले की, पर्ल विरोधात पक्के पुरावे असल्याने त्याला अटक करण्यात आले आहे.

सध्या पर्ल ‘ब्रह्मराक्षस २’ मध्ये दिसत असून, त्याने ‘नागार्जुन एक योद्धा’, ‘बेपनाह प्यार’ आणि ‘नागिन ३’ मालिकांमध्ये काम केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.