सध्या देशभरात सणांचे वातावरण आहे. दिवाळी येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी सोशल मीडियावर विविध अभियान राबवले जात आहेत. दरम्यान, आता ‘नो बिंदी नो बिझनेस’ नावाचे अभियान सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. अशा परिस्थितीत नुकतीच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या ट्वीटमध्ये लेखिकेने म्हटले होते की, ती टिकलीशिवाय मॉडेल असलेल्या कोणत्याही ब्रँडकडून काहीही खरेदी करणार नाही. या ट्वीटला उत्तर देताना ‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री दिव्यांकाने लिहिले की, “नो बिंदी नो बिझनेस? तिला काय घालायचे हे स्त्रीची निवड असावी! हिंदू धर्मात निवडीचा आदर केला जातो. स्त्रिया काय परिधान करतात यावरून कोणतीही संस्कृती का मोजली जावी? स्त्रिया जेव्हा अशा संकल्पनांचा प्रचार करतात, तेव्हा मला आश्चर्य वाटते!”
No bindi no business? It should be a woman's choice what she wants to wear! Hinduism is about respecting choices!
Next you'll want purda-system & then Satipratha back?
Why should any culture be measured by women's dressing?
I'm further shocked when women propagate such concepts! pic.twitter.com/9RuozCWsis— Divyanka T Dahiya (@Divyanka_T) October 30, 2021
अनेक नेटकऱ्यांनी तिला या अभियानाबद्दल वाचायला सांगितले. आपला मुद्दा ठेवत दिव्यांका म्हणाली की, “ही महिलांची निवड असावी.” अलीकडेच तिने बिंदीशिवाय दिवाळीच्या जाहिरातीचे शूटिंग केल्याचेही तिने उघड केले. ती म्हणाली की, “ब्रँडचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.”
दिव्यांकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे देसी अवतारात दिसली होती. मात्र, तिने बिंदी त्यामध्ये लावली नव्हती. हे फोटो शेअर करताना दिव्यांकाने लिहिले की, “तेच परिधान करा, जे तुमचे मन सांगते. ते नाही, जे तुम्हाला जग सांगते ते स्त्री असो वा पुरुष.”
दिव्यांकाने पुढे लिहिले की, “हे मूलभूत मानवी हक्क असले पाहिजेत. एक तर्कशुद्ध आणि विकसित समाज पाहण्याची वाट पाहत आहे.”
दिव्यांका त्रिपाठीच्या या ट्वीट आणि पोस्टवर कमेंट करत चाहत्यांकडून तिच्या उत्तराचे समर्थन केले जात आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर
-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल