Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सारा- इब्राहिमपासून ते रणबीर- रिद्धिमापर्यंत ‘या’ बहीण- भावांच्या जोड्या आहेत खूपच प्रसिद्ध; एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

पूर्वीच्या तुलनेत आता बॉलिवूडमध्ये बरेच बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळात कोणत्याही बॉलिवूड कलाकारांच्या कुटुंबाविषयी फारसे उघडपणे बोलले जात नव्हते. तसेच आताच्या काळात अनेक कलाकार हे आपल्या कुटुंबाबद्दल खुलेपणाने बोलताना दिसतात. अगदी अनेक कलाकारांचे भाऊ किंवा बहिणी बाॅलिवूडमध्ये नसूनही ते सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा काही भावंडांची जोडी आहे, ज्यांनी आपल्या जबरदस्त कारकिर्दीमुळे प्रत्येकाची मने जिंकली आहेत.

बहीण- भाऊ म्हटले की वाद हे आलेच. अनेकदा छोटे असेल किंवा मोठे तरीही ते सतत भांडण करताना दिसत असतात. असेच काही बहीण- भाऊ चित्रपटसृष्टीतही आहेत. अनेक बहीण- भावाच्या जोड्या तुम्हाला माहिती असतील. आता नुकताच रक्षाबंधन सण देखील जवळ आला आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊयात बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार बहीण- भावांच्या जोड्या.

सारा अली खान आणि इब्राहिम अली खान
सर्वच बहिणी आणि भावांमध्ये खूप प्रेम असते, पण असे काही बहीण- भाऊ आहेत, जे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सारा आणि इब्राहिम हे बहीण- भावापेक्षा चांगले मित्र आहेत. सारा अनेकदा तिच्या भावासोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

सोहा अली खान आणि सैफ अली खान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला सोहा आणि सबा या दोन बहिणी आहेत. सैफ त्याच्या दोन्ही बहिणींवर खूप प्रेम करतो. मात्र, सोहासोबत सैफचे बाँडिंग अधिक घट्ट असल्याचे दिसून येते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन्ही भाऊ आणि बहीण एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. बॉलिवूडची ही शाही बहीण-भावांची जोडी एकमेकांच्या कामात खूप मदत करताना दिसते.

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर
अर्जुन त्याच्या बहिणींबद्दल नेहमीच पझेसिव्ह असतो. तो त्यांच्या बहिणीची प्रचंड काळजी घेतो. अंशुलाच नाही, तर जान्हवी कपूरच्याही तो खूप जवळ आहे. श्रीदेवींच्या निधनानंतर अर्जुन जान्हवीची खूप काळजी घेतो. जान्हवी अर्जुनची सावत्र बहीण आहे, तरीही दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग आहे.

सलमान खान आणि अर्पिता
सलमान खानला बाॅलिवूडचा दबंग म्हणून ओळखले जाते. त्याला फॅमिली मॅनदेखील म्हटले जाते. सलमानला जेव्हा त्याच्या कुटुंबाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते, तेव्हा तो ही संधी हातून अजिबात निसटून देत नाही. सलमान त्याच्या सर्व भावंडांवर प्रेम करतो, पण तो सर्वात जास्त अर्पिताच्या जवळ आहे. सलमान अर्पिताबद्दल खूप हळव्या मनाचा आहे आणि त्याला फक्त आपल्या बहिणीला आनंदी बघायचे आहे.

रणबीर आणि रिद्धिमा
कपूर कुटुंबात वाढलेले रणबीर आणि रिद्धिमा एकमेकांवर खूप प्रेम करतात. रणबीरने स्वत: चे करिअर यक्षस्वी केले आहे, तर रिद्धिमा प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. रणबीर आणि रिद्धिमाची जोडी खूप प्रसिद्ध आहे.

ते दोघे नेहमी एकमेकांना साथ देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड; ‘तेरे नाम’नंतर उंचावला भूमिकाचा चित्रपटातील आलेख, आज आहे खूपच ग्लॅमरस

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

हे देखील वाचा