Monday, September 25, 2023

लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड; ‘तेरे नाम’नंतर उंचावला भूमिकाचा चित्रपटातील आलेख, आज आहे खूपच ग्लॅमरस

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री वयाच्या विसाव्या वर्षीच येतात. इथे आल्यानंतर अनेकांचे नशीब पहिल्या चित्रपटातच चमकते, तर अनेकांना 10 चित्रपट करून देखील यश मिळत नाही. अशात अनेक अभिनेत्रींचे लग्न झाल्यानंतर कुटुंबीयांसाठी त्या अभिनयाकडे दुर्लक्ष करतात. तसेच काही अभिनेत्री लग्न झाल्यावरही अभिनयातील आपली पकड तशीच मजबूत धरून ठेवतात. काही अभिनेत्री सुरुवातीला दोन- तीन चित्रपटांचा अनुभव घेतात. हे चित्रपट चालले नाही, तर त्या हे क्षेत्र सोडून देतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला होय. भूमिका 21 ऑगस्ट तिचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिचा जीवनप्रवास.

भूमिकाचा जन्म 21 ऑगस्ट, 1978 रोजी नवी दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. तिने तिचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. त्यानंतर मॉडेलिंगसाठी तिने पुणे व मुंबई ही शहरे गाठली. भूमिकाचे वडील आर्मी ऑफिसर होते व आई शिक्षिका होत्या. भुमिकाच्या कुटुंबीयांमध्ये कोणीही चित्रपटसृष्टीतले नव्हते. परंतु या अभिनेत्रीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. (Bhumika chawla birthday special the simple actress of tere nam now looks glamorous)

भूमिकाची अभिनयातील कारकीर्द
भूमिकाने मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्या करिअरच्या सुरुवातीला तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. ‘युवाकुडू’ हा तिचा पहिला चित्रपट होता. त्याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली. त्यांनतर तिचा दुसरा चित्रपट होता ‘खुशी’ या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर कमालीची कामगिरी केली. या चित्रपटासाठी भूमिकाला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानितही केले गेले.

यानंतर भूमिका ‘तेरे नाम’ या बॉलिवूडमध्ये चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलचं डोक्यावर घेतलं. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आजही या चित्रपटाची गाणी तरुण मंडळी आवर्जून ऐकतात. या चित्रपटानंतर भूमिकाचा चित्रपटांमधील आलेख थोडा उंचावला. या चित्रपटामध्ये भूमिकाचा साधाभोळा चेहरा व मोठे डोळे प्रेक्षकांना आकर्षित करत होते.

त्यानंतर भूमिकाने ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘रन’, ‘सिलसिले’, ‘फैमिली’, ‘गांधी’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. अभिनेत्रीचा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर बाकीचे सर्व चित्रपट हे फ्लॉप झाले. त्यानंतर हळूहळू तिने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला.

अभिनेत्रीने 2007 साली भरत ठाकूरबरोबर विवाह केला. चार वर्षे ते दोघे एकमेकांना डेट करत होते. भूमिका २०१४ मध्ये आई झाली. तिला एक मुलगा आहे. ती बॉलिवूडमध्ये करिअर बनवू शकली नाही. परंतु तिने तेलुगू चित्रपटांमधील आपली पकड कायम ठेवली आहे. तसेच ती पूर्वीपेक्षा आता अधिक स्टायलिश झाली आहे.

 

हेही नक्की वाचा-
तारा सिंगला मोठा दणका! सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव? एकदा वाचाच
प्रियंका गांधींनी गीतातून वाहिली राजीव गांधींना आदरांजली; म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चन यांनी..’

हे देखील वाचा