Monday, June 23, 2025
Home हॉलीवूड ‘या’ कारणामुळे ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ सिनेमाला आखाती देशांमध्ये प्रदर्शनास मज्जाव

‘या’ कारणामुळे ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ सिनेमाला आखाती देशांमध्ये प्रदर्शनास मज्जाव

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अशा मार्वल स्टुडिओचे सिनेमे संपूर्ण जगात तुफान गाजतात. एवेन्जर्स, एन्ट मॅन, कॅप्टन मार्वल आदी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. कमाईच्या बाबतीतही या सिनेमांनी कहर केला होता. आता लवकरच मार्वल स्टुडिओचा नवीन सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

मार्वल स्टुडिओचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल संपूर्ण जगात मोठा बज निर्माण झाला असून सर्वच लोकं या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहे. मात्र आता या सिनेमाशी संबंधित एका बातमीने आता अनेक देशातील सिनेप्रेमींची निराशा केली आहे. ६ मे ला अमेरिकेत प्रदर्शित होणार ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा सिनेमा सौदी अरेबियन देश आणि आखाती देशांमध्ये ५ मे ला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार नसल्याचे समजत आहे.

सौदी अरेबियन देशाच्या सेन्सर बोर्डाने बेनेडिक्ट कंबरबेंचच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या या सुपरहिरो चित्रपटाला अजूनपर्यंत डिस्ट्रिब्युशन सर्टिफिकेट मिळाले नाही. प्राप्त माहितीनुसार दावा केला जात आहे की, आखाती देशांनी असा निर्णय चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या समलैंगिक पात्रांमुळे घेतला असल्याचे सांगितले आहे. आखाती देशांमध्ये समलैंगिकतेला अजिबात प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे एलजीबीटीक्यू विषयांवर तयार झालेल्या कोणत्याही चित्रपटांना सेंसर बोर्ड डिस्ट्रीब्यूशन सर्टिफिकेट कधीच देत नाही. म्हणूनच ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ सिनेमाला हे डिस्ट्रीब्यूशन सर्टिफिकेट नाकारण्यात आले आहे. याआधी देखील मार्वल स्टुडिओच्या ‘द इंटर्नल’ सिनेमाला देखील सौदी अरब देशांमध्ये प्रतिबंधित केले गेले होते.

यातच काही दिवसांपूर्वी सीबीएफसी ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ सिनेमाला कोणत्याही कटशिवाय सेन्सर सर्टिफिकेट दिले गेले आहे. हा सिनेमा १२६ मिनिटं अर्थात २ तास ६ मिनिटांचा असून मार्वल स्टुडिओचा हा मागील तीन वर्षातील सर्वात छोटा सिनेमा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा