अंमली पदार्थ प्रकरणी अडकलेल्या आर्यन खानला गुरुवारी मिळणार जामीन? जाणून घ्या काय सांगतात प्रसिद्ध वकील

मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये एक विषय चांगलाच रंगला आहे, तो म्हणजे सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अंमली पदार्थ प्रकरण होय. या गंभीर प्रकरणात आर्यन खान ७ ऑक्टोबरपर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) कस्टडीत आहे. अशामध्ये आर्यनचे वकील सतीश मानेशिंद लवकरात लवकर आर्यनला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारी (७ ऑक्टोबर) या प्रकरणात पुन्हा सुनावणी होणार आहे. अशामध्ये प्रश्न उपस्थित होतो की, सतीश हे आर्यनला जामीन मिळवून देऊ शकतील की नाही? या प्रकरणात माध्यमांनी प्रसिद्ध वकिलांशी चर्चा केली. यावर त्यांनी काय सांगितले जाणून घेऊया…

आर्यन खानवर एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत ४ कलमे लावली आहेत. यामध्ये कलम ८ सी आहे, ज्यामध्ये अंमली पदार्थांच्या उत्पादनापासून ते ताबा, विकणे, विकत घेणे, वापर करणे यांच्या तरतूदी आहेत. दुसरे कलम २० बी आहे, जे गांजाशी संबंधित आहे. तिसरे कलम २७ आहे, जे अंमली पदार्थाच्या सेवनाशी संबंधित आहे. तसेच आणखी एक कलम ३५ आहे. आर्यन खान अद्याप एनसीबीच्या कस्टडीत आहे. त्याचे हे प्रकरण देशातील प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे सांभाळत आहेत. सतीश हे अशा प्रकरणांसाठी प्रसिद्ध आहेत. (Does Superstar Shahrukh Khans Son Aryan Khan Will Get Bail On 7 October)

या प्रकरणाबाबत इतर वकिलांचे काय मत आहे, जाणून घेऊया. वरिष्ठ वकील हितेश जैन यांनी सांगितले की, “जवळपास एक वर्षापूर्वी रिया चक्रवर्तीच्या प्रकरणात सांगण्यात आले होते की, जर मिळालेली अंमली पदार्थाचे प्रमाण कमी असल्यास, गुन्हा जामीनपात्र ठरतो. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की, हा जामीनपात्र गुन्हा नसला तरी आरोपी या गुन्ह्यासाठी दोषी नाही या आधारावर न्यायालय जामीन देण्यास तयार आहे. या कायद्यानुसार त्याने दुसरा गुन्हा केल्याची शक्यता नाही. चॅट पाहता, ती व्यक्ती दोषी आहे, असे म्हणता येणार नाही.”

वरिष्ठ वकील दीपेश मेहता यांनी म्हटले की, “एनसीबीच्या एफआयआरची कलमे पाहून मी म्हणेन की आर्यनवर जामीनपात्र गुन्हा दाखल आहे. जास्तीत जास्त शिक्षा १ वर्ष आणि २०,००० रुपयांपर्यंत दंड आहे. तथापि, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे, त्यामुळे पुढे काही सांगणे फार घाईचे ठरेलल.”

दीवाणी प्रकरणातील प्रसिद्ध क्रिमिनिल वकील अशोक सरावगी यांनी म्हटले की, “जर एनसीबी ज्या व्हॉट्सऍप चॅटबद्दल बोलत आहे, ते तितकेच आक्षेपार्ह आहे, जितके ते आर्यन खानला जामीन मिळणे कठीण असल्याचा दावा करत आहेत. या प्रकरणात अंमली पदार्थ खरेदी, विक्री आणि वापरात त्यांचा सहभाग आढळल्यास तो तुरुंगातही जाऊ शकतो.”

आर्यनचे या प्रकरणात नाव समोर आल्यापासून बॉलिवूडला धक्का बसला आहे. अनेक कलाकार त्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत. नुकतेच मिका सिंग, सुझेन खान यांनी आर्यनला पाठिंबा दर्शवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’