Sunday, September 8, 2024
Home कॅलेंडर Death Anniversary: कोण होते राजकुमार? ज्यांंना वीरप्पनने १०८ दिवस ठेवले होते कैदेत

Death Anniversary: कोण होते राजकुमार? ज्यांंना वीरप्पनने १०८ दिवस ठेवले होते कैदेत

भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार झाले आहेत, जे या जगाचा निरोप घेतल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते डॉ. राजकुमार यांचाही अशा अभिनेत्यांच्या यादीत समावेश आहे, जे आता आपल्यात नाहीत पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अभिनेत्याची नेहमी आठवण येते. २४ एप्रिल १९२९ रोजी जन्मलेले राजकुमार दिवंगत अभिनेते पुनित राजकुमार यांचे वडील आहेत. राजकुमारने आपल्या करिअरमध्ये कन्नड चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.मात्र १२ एप्रिल २००६ रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आम्ही तुमच्यासाठी अभिनेत्याच्या अपहरण प्रकरणासह त्याच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये घेऊन आलो आहोत.

अभिनेता राजकुमार यांचे खरे नाव ‘सिंगानलूर पुट्टास्वामैया मुत्तुराज’ आहे, ज्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते वडिलांसोबत तत्कालीन दिग्गज दिग्दर्शक गुब्बी वीराण्णा यांच्या गटात काम करायचे. इथेच त्यांना अभिनयातील बारकावे शिकायला मिळाले. त्यानंतर त्यांनी गायलाही सुरुवात केली. थिएटर सोडल्यानंतर अभिनेते राजकुमार यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि येथे आपली छाप सोडली.

डॉ. राजकुमार यांनी १९५४ साली प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट ‘बेद्रा कन्नप्पा’ मधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत, राजकुमारने २०० हून अधिक चित्रपटांमध्ये चमकदार कामगिरी केली. थोडक्यात सांगायचे तर, त्याने आपली कारकीर्द कन्नड सिनेमाला समर्पित केली. ‘महात्यम’, ‘रणधीरा कांतीर्व’, ‘कविरत्न कालिदास’, ‘जेदारा बढे’ आणि ‘गौरी’ हे त्यांचे काही उत्कृष्ट चित्रपट आहेत.

इंडस्ट्रीत उत्तम चित्रपट देण्यासोबतच राजकुमारने हिट गाणीही गायली आहेत. रंगभूमीच्या काळात शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेऊन ते कुशल पार्श्वगायक बनले होते. १९७४ पासून त्यांनी बहुतेक त्यांच्या चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यांच्या हिट लिस्टमध्ये ‘यारे कौगदली’, ‘हुट्टीदारे कन्नड’, ‘हे दिन करा’, ‘हृदय समुद्र’, ‘माणिकवीणा’ आणि ‘नादमाया’ अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

अभिनेत्याच्या आयुष्याशी संबंधित या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. डॉ.राजकुमार यांचे २००० साली चंदन तस्कर वीरप्पन याने अपहरण केले होते. या एका घटनेने संपूर्ण राज्य हादरले. अवस्था अशी झाली होती की अभिनेत्याचे चाहते रस्त्यावर आले होते. अभिनेत्याच्या सुटकेच्या बदल्यात वीरप्पनच्या मागण्यांवर नक्केरन या तमिळ मासिकाचे संपादक पत्रकार आरआर गोपाल यांनी चर्चा केली. त्यानंतर १०८ दिवसांनी वीरप्पनने त्याला सोडले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा