Tuesday, July 9, 2024

डॉक्टर-डॉक्टर! तब्बल ९१ वय असलेल्या डॉक्टरांनी केली अनुष्काची डिलिव्हरी, पाहा कसा आहे त्यांचा मनोरंजक प्रवास

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आई-बाबा झाले आहेत. ११ जानेवारीला अनुष्काने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. प्राप्त माहितीनुसार अनुष्काची डिलिव्हरी डॉ रुस्तम सुनावाला यांनी केली आहे. याच डॉ. सुनावाला यांनी तैमूरच्या वेळेस करीना कपूर- खानची डिलिव्हरी केली होती.

विशेष म्हणजे डॉ. सुनावाला यांना चिकित्सा क्षेत्रात त्यांच्या अमूल्य योगदानासाठी १९९१ मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ सुनावाला हे आर. पी. सुनावाला नावाने ओळखले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सुनावलाच करीना कपूरची दुसरी डिलिव्हरी करणार आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे करीनाच्या आईची डिलीव्हरी देखील याच डॉक्टरांनी केली होती. डॉ. सुनावाला यांच्याकडे अनेक मोठ्या कलाकारांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या डिलिव्हरी झाल्या आहेत.

त्यात करिष्मा कपूर आणि करीना कपूरची आई बबिता, जया बच्चन, नीतू कपूर, गौरी खान आणि विजय माल्याची पत्नी आदी मोठ्या लोकांचा समावेश आहे.

डॉक्टर आर. पी. सुनावाला यांनी १९४८ सालापासून मेडिकलची प्रॅक्टिस सुरु केली. रश्मी उदय सिंग यांनी डॉ. सुनावाला यांच्यावर ‘लाईफगिवर’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात डॉ सुनावाला यांनी सांगितले की, मी जेव्हा प्रॅक्टिस सुरु केली तेव्हा लोकांची नाडी बघून त्यांच्यावर उपचार केले जायचे. डायग्नोस्टिक प्रक्रिया आणि ब्लड ग्रुप ह्या गोष्टी खूप नंतर आल्या.

तत्पूर्वी विराट आणि अनुष्काने अजूनही त्यांच्या मुलीचा फोटो जगासमोर आणला नसून त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या मुलीला अजून मीडियापासून दूर ठेवणार आहोत. ‘आमच्या खाजगी आयुष्याचा सन्मान राखावा’ असे निवेदनही त्यांनी माध्यमांना दिले आहे.

हे देखील वाचा