Saturday, July 6, 2024

राखीला मिळाला तिचा ‘शहजादा’, युजर्स ट्राेल करत म्हणाले, ‘आंटीजी, तुम्हाला किती नवरे…’

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत स्वतःच्या आयुष्याची खिल्ली उडवून लोकांना हसवते. बिग बॉसपासून एअरपोर्टपर्यंत चाहत्यांचे मनोरंजन करायला राखी विसरत नाही. आजकाल राखी दुबईत असून खूप चिल करत आहे. दरम्यान, राखीचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या नवीन राजकुमारासोबत मस्ती करताना दिसत आहे. राखीने सांगितले की, ‘तिला दुबईमध्ये नवीन नवरा मिळाला आहे’.

राखी सावंत (rakhi sawant) तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. अशात अलीकडेच पॅपराझीने राखीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राखी दुबईमध्ये मस्ती करताना दिसत आहे. इतकेच नाही, तर आदिल खान दुर्रानी याच्यानंतर राखीला नवा नवरा मिळाला आहे.

व्हिडिओमध्ये राखी एका अरबी व्यक्तीचा हात धरून फिरताना दिसत आहे. यावेळी तिने हिरव्या आणि सोनेरी रंगाचा शरारा घातला आहे. अशात राखी खुल्या केसांमध्ये आणि भारी मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती म्हणते, “या हबीबी…राखी सावंतला मिळाला तिचा हबीबी..तुम्ही हे बघू शकता, मी दुबईला आले आहे, मला माझा राजकुमार सापडला आहे.” याशिवाय राखी त्या अरबी माणसाला तिची स्तुती करायला सांगते, ज्यावर तिचा राजकुमार तिच्या  सौंदर्यावर काही ओळी बोलताना दिसताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओतील सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे राखीचा, ज्या व्यक्तीच्या हातात आहे तो व्यक्ती अब्दु रोजिकसारख्या मुलासारखा दिसत आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आंटीजी, तुम्हाला किती नवरे हवेत…?’ त्याचवेळी काही युजर्स अभिनेत्रीला ट्राेल करत म्हणाले, ‘शेख साहेब, आता ही नौटंकी भारतात पाठवू नका, तुमच्याकडे ठेवा’.., तर दुसर्‍या युजरने कमेंट केली, ‘नवीन बकरा आला आहे.’ अशाप्रकारे चाहते अभिनेत्रीच्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत राखीच्या व्हिडिओचा आनंद लुटत आहेत.(dramaqueen rakhi sawant find new husband in dubai funny video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅंडशेक करण्यासाठी आलेल्या लेडी फॅनसाेबत करीना कपूरने केले असे ‘कृत्य’, अभिनेत्रीची वागणूक पाहून चाहते थक्क

‘या’ चित्रपट निर्मात्यानं सलमान अन् आमिरवर केला माेठा आराेप; म्हणाला, ‘या दोघांमुळे माझा चित्रपट…’

हे देखील वाचा