Tuesday, April 23, 2024

“माझ्या आयुष्यातील समस्या विसरून आनंदित राहते ” जिया खान केसवर राखी सावंतने मांडले तिचे मत

ड्रामाक्वीन पेक्षा देखील दुसरे अजून वेगळे नाव असेल तर ते देखील राखीला पुरेसे ठरणार नाही, इतकी नाटकं तिची असतात. तिला लोकांची नस लक्षात आल्यामुळे काय बोलून, काय करून आपल्याला प्रसिद्धी मिळवता येईल हे तिला पक्के माहित झाले आहे. त्यामुळे ती सतत असेच काहीतरी करत असते ज्यामुळे तिला मीडियाचे अटेन्शन मिळेल. नुकताच अभिनेत्री जिया खान आत्महत्या केसचा निकाल लागला आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोप मुक्त केले गेले. तब्बल दहा वर्षांनी कोर्टाने त्यांचा निकाल सुरजच्या बाजूने दिला.

नुकतेच राखीला या निकालाबद्दल मीडियाने प्रश्न विचारला त्यावर बोलताना तिने जे उत्तर दिले, ते सध्या चांगलेच गाजत आहे. राखीने मीडियाशी बोलताना सांगितले की, “सूरज पांचोली माझा भाऊ आहे. हे कायदेशीर प्रकरण असून, आपल्याला नक्की वस्तुस्थिती माहीत नाही. मात्र जिया खानच्या मृत्यूबद्दल मला दु:ख आहे. पण आजकाल मुलींना काय झाले माहीत नाही. मुली प्रेमात काहीही विचार न करता करायला तयार होतात. माझ्यासोबतही असे झाले. मात्र मी सर्व विसरून खुश राहते हसते. कारण आयुष्य एकदाच मिळते. म्हणूनच कुणाच्या प्रेमात ते का संपवायचे. मग तो मुलगा असो की मुलगी. ‘मला समजत नाही की मुली प्रेमात आत्महत्या का करतात? एक गेला म्हणून काय झाले, दोन-चार परत येतील की नाही?”

दरम्यान राखीच्या या उत्तराला अनेकांनी समर्थन दिले तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. राखी मधल्या काही दिवसांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीची चर्चेत होती. तिने आदिल खान या व्यावसायिकांशी लग्न केले मात्र तिचे लग्न काही दिवसातच तुटले आणि तिने अदिलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा