Tuesday, July 9, 2024

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पॅपराझींना पाहून रडली ढसाढसा; म्हणाली,’तू माझ्या कबरीवरही…’

ड्रामा क्वीनराखी सावंत अनेकदा काेणत्या ना काेणत्या कारणाने सतत चर्चेत असते. सध्या राखी तिचे आदिल दुर्राणीसोबतचे लग्न आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. या सगळ्यामध्ये आता ‘ड्रामा क्वीन’चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये राखी सावंत पॅपराझींना फटकारताना दिसत आहे.

पॅपराझींवर ओरडल्यानंतर राखी सावंत (rakhi sawant) सर्वांसमोर ढसाढसा रडू लागते. ‘ड्रामा क्वीन’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रागाच्या भरात राखी सावंत तिथे उपस्थित सर्व फोटोग्राफर्सना असे काही बोली, ज्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.

खरं तर, व्हिडिओमध्ये राखी सावंत पॅपराझींना म्हणते, “मला एक गोष्ट सांग, ज्या दिवशी मी मेले त्या दिवशी तू माझ्या कबरीवर येणार का? माझी परिस्थिती कशी आहे, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही का?” राखीचे हे बोलणे ऐकून तेथे उपस्थित सर्व फोटोग्राफर्स तिचे सांत्वन करू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीचा हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडिया युजर्स दोन गटात विभागले गेले आहेत. एकीकडे राखीची ही अवस्था पाहून काही चाहते भावूक होताना दिसत होते, तर दुसरीकडे काही लोकांनी पुन्हा ड्रामा केल्याबद्दल राखीला ट्रोल करत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना, सोशल मीडिया युजर्सने लिहिले की, “परिस्थिती वाईट आहे पण बनावट पापण्या लावायला विसरू नका”.या व्हिडीओवर अनेक कमेंट येत असल्या तरी ‘बिग बॉस’मधून ओळख निर्माण करणारा गायक राहुल वैद्य याची कमेंट सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे. राहुलने कमेंटमध्ये लिहिले की, “अरे रे राखी काय झाले”.

तुम्ही राखी सावंतचे चाहते असाल किंवा नसाल, पण एक मात्र नक्की की ‘ड्रामा क्वीन’कडे दुर्लक्ष करणं खूप कठीण आहे.(dramaqueen rakhi sawant gets angry on paparazzi wept bitterly after inter religion marriage with adil khan)

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखवर भाईजान भारी? ‘पठाण’मध्ये सलमानच्या एन्ट्री चित्रपटगृहांमध्ये एकच कल्ला, व्हिडिओ झाले व्हायरल

बापरे! तब्बल 72 कोटींची संपत्ती संजू बाबाच्या नावावर करत चाहतीने घेतला अखेरचा श्वास…

हे देखील वाचा