Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड बाबो! कुणापेक्षा कमी नाय, ड्रामा क्वीन राखी सावंतची संपत्ती ऐकून बसेल हादरा

बाबो! कुणापेक्षा कमी नाय, ड्रामा क्वीन राखी सावंतची संपत्ती ऐकून बसेल हादरा

मनोरंजन विश्वात आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतला (Rakhi Sawant) कोणत्याही परिचयाची गरज नाही. ‘राखी मैं हूं ना’, ‘आयटम गर्ल’, ‘मस्ती’, ‘बुढा मर गया’, ‘एक कहानी जुली की’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. आजकाल राखी तिच्या अप्रतिम स्टाइलमुळे चर्चेत असते. राखीने केवळ नावच कमावले नाही, तर तिने आपल्या मेहनतीतून भरपूर संपत्तीही कमावली आहे. आजच्या काळात ती करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. राखीने तिच्या करिअरची सुरुवात1997मध्ये आलेल्या ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून केली होती. यानंतर तिला ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली.

राखी सावंतची कमाई
अभिनेत्री राखी सावंतची एकूण संपत्ती सुमारे 37 कोटी आहे, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या कमाईचा मुख्य स्त्रोत स्टेज शो, रियॅलिटी शो आणि जाहिराती आहेत. राखी प्रत्येकातून बक्कळ पैसा कमावते. यासोबतच राखी सावंतचे मुंबईत दोन अपार्टमेंट आणि एक बंगला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या बंगल्याची किंमत जवळपास 11 कोटी रुपये आहे. तिचा बंगला आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही. यासोबतच राखी सावंतला महागड्या कारचीही खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये फोर्ड एंडेव्हरसोबत पोलो कार देखील आहे. (rakhi sawant net worth know about properties)

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन!
अभिनेत्री राखी सावंतही अनेकदा वादाची शिकार झाली आहे. कधी राहुल गांधींशी लग्न करण्याच्या इच्छेमुळे, तर कधी मिका सिंगच्या किसमुळे. या प्रकरणांमुळे ती अनेकदा वादात सापडली. यासोबतच राखी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचा-
वस्त्रहरणाचा सीन दिल्यानंतर अर्धा तास रडत होत्या रूपा गांगुली, अशाप्रकारे शूट झाला सीन
अभिनेत्री बनण्यासाठी पैसे चोरून सोडले होते घर, असा होता राखी सावंतचा संघर्षमय प्रवास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा