Friday, July 5, 2024

राखीच्या आयुष्यात पुन्हा आले वादळ, पती आदिल दुर्राणीवर केला गंभीर आरोप; म्हणाली, ‘मला श्रद्धा …’

राखी सावंतच्या आईने काही दिवसांपुर्वीच जगाचा निराेप घेतला. अशात आता तिचा नवराही हातातून निसटणार असल्याचं दिसत आहे. राखीचे वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार चालू आहे. आदिलचे कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर सुरू आहे. याचा खुलासा खुद्द राखीने केला आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

राखी (rakhi sawant) हिने अलीकडेच आदिल दुर्रानी (adil durrani) सोबत लग्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. यावेळी तिने रजिस्टरची कागदपत्रे आणि लग्नाचे फोटो देखील शेअर केले होते. मात्र, आदिल हे लग्न स्वीकारण्यास नकार देत असल्याचे राखीने सांगितले, त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. ज्यानंतर राखीने सांगितले की, सलमान भाईने बाेल्यानंतर आदिलने लग्न स्वीकारले. मात्र, अशात आता राखीने आदिलच्या प्रेयसीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

पॅपराझींशी बोलताना राखीने सांगितले की, “तुम्हा लोकांच्या माध्यमातून मी त्या मुलीला सावध करू इच्छिते की, जेव्हा मी ‘बिग बॉस’ मराठी 4 मध्ये होते तेव्हा तिने या संधीचा फायदा घेतला. मी तीचे नाव सांगणार नाही पण वेळ आल्यावर फोटो आणि व्हिडिओ दाखवेन. आदिल म्हणतो, ‘तू माझा देव आहेस, खुदा आहे, अल्लाह नंतर तूच आहेस…’ नाही माझी तुलना खुदासोबत करू नकोस.. मला पत्नी, मुलांची आई व्हायचे आहे, मला माणूस व्हायचे आहे. मला हे सगळं सांगायचं नव्हतं, म्हणून आत्तापर्यंत गप्प राहिले. त्या मुलीमुळे आदिलने लग्नास नकार दिला. त्यानंतर मीडिया-फॅन्स आणि जगाच्या भीतीने लग्नाचा स्वीकार केला, पण मला कोणाची शिडी व्हायचे नाही. मला शिडी बनवू नका.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीने आदिलच्या प्रेयसीला इशारा दिला की, ‘एक महिला एका महिलेचे घर तोडत आहे. मी तुझे नाव, फोटो आणि व्हिडिओ समोर आणत नाही याचे तू आभार मानायला हवे. डाेळे खाली करून कसे सहन करायचे हे मला कळते, तर डोळे मोठे करून स्वाभिमान आणि लग्नासाठी कसे लढायचे हेही मला कळते. मी इतर मुलींप्रमाणे गप्प बसणार नाही, आदिलला सोडले नाही तर व्हिडिओ फोटो व्हायरल करेन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याचवेळी राखीलाही तिच्या जीवाची भीती वाटत आहे. दिल्लीतील आफताब पूनावाला आणि श्रद्धा वॉकरचे प्रकरण सांगत ती म्हणाली, “आदिल तू म्हणताेना का मीडियासमाेर येते, घरातली गाेष्ट घरात ठेवत जा. घरात राहून मला फ्रीजमद्ये जायचे नाही. मी एक विवाहित महिला आहे आणि माझ्या हक्कांसाठी लढणार आहे.”

राखीचे अनेक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहेत, ज्यामध्ये ती आदिलला घटस्फोट देणार नसल्याचे सांगत रडत आहे.(dramaqueen rakhi sawant married life again in trouble she reveals about adil durrani affair copmpare herself with shraddha walkar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जितेंद्र जोशींच्या ‘गोदावरी’ सिनेमाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा, SCO फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार

नेहमीच बोल्ड अवतारात दिसणाऱ्या दिशाने एथनिक आऊटफिटमध्ये वेधले चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा