Tuesday, January 14, 2025
Home बॉलीवूड बारीक असल्याने बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला नाकारले होते काम… नंतर घडवला इतिहास !

बारीक असल्याने बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला नाकारले होते काम… नंतर घडवला इतिहास !

बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा मालिनी (Hema Malini) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मोठमोठे चित्रपट दिले आहेत. ७० च्या दशकात हेमा मालिनी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. हेमा यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण या प्रवासात हेमा मालिनी यांना इंडस्ट्रीत काही कठीण आणि निराशाजनक गोष्टींना देखील सामोरे जावे लागले.

इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यापूर्वी हेमा मालिनी यांना त्यांच्या लुकमुळे नकाराचा सामना करावा लागला होता. १९६३ साली हेमा यांनी तमिळ चित्रपटांसाठी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. पुढे वेनिरदाई नावाचा एक तमिळ चित्रपट करताना दिग्दर्शक सी.व्ही. श्रीधर यांनी हेमा यांना तब्येतीने बारीक असल्याने सिनेमात काम नाकारले होते.

हेमा यांनी १९६८ मध्ये महेश कौल दिग्दर्शित तिच्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘सपनो का सौदागर’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी राज कपूरसोबत काम केले होते.

या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि हळूहळू त्यांच्या कामामुळे त्यांना “ड्रीम गर्ल” ही पदवी मिळाली. हेमा मालिनी यांना १९७० मध्ये आलेल्या ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. विजय आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये त्यांनी देव आनंदसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला.

‘जॉनी मेरा नाम’च्या यशानंतर हेमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले, ज्यात ‘देशप्रेमी’, नसीब, क्रांती ”, ‘सत्ते पे सत्ता’, ‘शोले’ आणि ‘लाल पत्थर’ या चित्रपटांचा समावेश होता. १९७४ मध्ये त्यांनी ‘शोले’ साइन केला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणून उदयास आला. त्यात त्या बसंतीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आर्यन खानने खरेदी केली वडिलांची प्रॉपर्टी … ३७ कोटी रुपयांना खरेदी केले २ मजले
न्यू जर्सीमध्ये फॅनने लावला होता बिग बींचा पुतळा, गुगल मॅपमध्ये सापडली ही खास जागा

हे देखील वाचा