Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हीच प्रसिद्धीची किंमत’, म्हणत अंमली पदार्थ प्रकरणात ‘या’ दोन अभिनेत्रींनी दर्शवला शाहरुख खानला पाठिंबा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने रविवारी (३ऑक्टोबर) अंमली पदार्थाच्या पार्टी प्रकरणात अटक केली आहे. अटक केल्यानंतर आर्यनला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला एक दिवसासाठी एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर काही बॉलिवूड कलाकार गप्प आहेत, तर काही शाहरुख खानचे समर्थन करताना दिसत आहेत. आर्यनच्या अटकेनंतर प्रथम अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली. यानंतर रात्री उशिरा सलमान खानही शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. आता बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींनी शाहरुखला सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला आहे. आर्यन खानच्या अटकेच्या प्रकरणात पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्वीट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुखच्या समर्थनार्थ पूजा भट्टचे ट्वीट
शाहरुखसोबत ‘चाहत’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री पूजा भट्टनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा दिला आहे. तिने लिहिले आहे की, “शाहरुख मी तुझ्या पाठीशी उभी आहे. तुला त्याची गरज आहे असे नाही, पण मी ते करत आहे, ही वेळ देखील जाईल.” शेवटी तिने हात जोडलेली इमोजी देखील वापरली आहे.

सुचित्रानेही केले ट्वीट 

‘कभी हा कभी ना’ चित्रपटात शाहरुखसोबत दिसलेली सुचित्रा म्हणाली की, “पालकांसाठी त्यांच्या मुलांना अडचणीत पाहण्यापेक्षा कुठलीच गोष्ट कठीण नाही. सर्वाना प्रार्थना.”

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये तिने लिहिले की, “बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्यांसाठी, चित्रपट कलाकारांवर एनसीबीचे सर्व छापे आठवणीत आहेत? होय, काहीही सापडले नाही आणि काहीही सिद्ध झाले नाही. हा एक तमाशा आहे. प्रसिद्धीची किंमत.”

सुनील शेट्टीनेही केला होता बचाव
सुनील शेट्टी म्हणाला आहे की, “जेव्हा एखाद्या ठिकाणी रेड पडते, तेव्हा तेथे बरेच लोक असतात. अशा स्थितीत आपण हे का मानतो की, मुलाने अमली पदार्थाचे सेवन केले आहे. त्या मुलाला श्वास घेण्याची तरी जागा द्या. आपल्या इंडस्ट्रीमध्ये काहीही झाले की, मीडिया पूर्णपणे तुटून पडते.” याशिवाय, सलमान खान स्वतः त्याला भेटण्यासाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचला होता.

आर्यन खानला एनसीबीने रविवारी मुंबईहून गोव्याच्या क्रूझवर रेव्ह पार्टीच्या संदर्भात १५ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन व्यतिरिक्त, मुनमुन धामेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना एक दिवसाच्या रिमांडवर एनसीबीच्या ताब्यात दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा