Saturday, June 29, 2024

बापरे! ‘या’ अभिनेत्रीच्या मॅनेजरला अटक, दोनशे किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एनसीबीने घेतले ताब्यात

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी करताना अनेक खळबळजनक खुलासे झाले. यातलाच एक महत्वाचा आणि बॉलिवूडला हादरवणारा खुलासा म्हणजे बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन. या ड्रग्स कनेक्शनमध्ये एनसीबीने अनेक बडया कलाकारांना समन्स बजावले होते. या एनसीबीच्या कचाट्यातून चित्रपटसृष्टीसोबतच टेलिव्हिजन सृष्टीदेखील सुटली नाही. नुकतेच अर्जुन रामपालला समन्स पाठवून त्याची चौकशी एनसीबीने केली. आता यात नवीन खुलासे समोर येत असून नवीन लोकांना एनसीबीने अटक केली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला फर्नीचरवाला, तिची बहीण शाहिस्ता आणि ब्रिटिश नागरिक असलेल्या करण सजनानीला अटक केली आहे. या अटकेसोबतच पोलिसांनी त्यांच्याकडून २०० किलो गांजा जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार एनसीबीने सांगितले की, ” एनसीबीने वांद्र्याच्या पश्चिम भागात एका कुरियरमधून गांजा जप्त केला आहे. यानंतर खार पश्चिमेला राहणारा आणि ब्रिटिश नागरिक असणाऱ्या करण सजनानीच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

करणच्या माहितीनुसार राहिला फर्निचरवाला आणि तिची बहीण शाहिस्ता यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करणने प्रतिबंधित असलेले ड्रग्स मुंबईतल्या त्याच्या विविध क्लाएंट्सला पाठ्वण्यासाठी पॅक करून ठेवले होते. यासर्व गोष्टींचा संबंध सुशांतसिंग राजपूतच्या केसही जोडलेला असून, करण अनुज केसवाणीचा सप्लायर राहिला आहे. अनुजला आधीच एनसीबीने अटक केली आहे.

एनसीबी या केसमध्ये सुशांतच्या जवळचा आणि सहायक दिग्दर्शक असणाऱ्या ऋषिकेश पवारचा शोध घेत आहे. ऋषिकेशला एनसीबीने अनेक वेळा चौकशीसाठी समन बजावला होता. मात्र तरीही ऋषिकेश चौकशीसाठी एनसीबी समोर हजर झालेला नाहीये. एका ड्रग्स सप्लायरने ऋषिकेश पवारचे नाव घेतले होते. एनसीबीने एकदा ऋषिकेशची चौकशी केली आहेत. सुशांतच्या हाऊस मॅनेजर असलेल्या दीपेश सावंतने देखील सांगितले होते की ऋषिकेशच सुशांतला ड्रग्स पुरवायचा.

सुशांतसिंग राजपूत १४ जून २०२० ला त्याच्या मुंबईच्या घरात पंख्याला लटकेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या मृत्यूनंतर सीबीआय, ईडी,एनसीबी, मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांनी या आत्महत्येची चौकशी केली. परंतु अजून कोणालाही निष्कर्ष काढता आला नाही. या दरम्यान या केसमध्ये ड्रग्सचे वळण आल्याने सुशांतच्या गर्लफ्रेंडला ड्रग्स आरोपांमध्ये अटक देखील झाली होती. रियाला एक महिना तर तिच्या भावाला शोविकला तीन महिने जेलमध्ये राहावे लागले होता.

दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अर्जुन रामपाल या मोठ्या कलाकारांची एनसीबीने चौकशी केली होती तर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना या केसमध्ये अटक झाली होती. सध्या भारती आणि हर्ष जामिनावर बाहेर असून आतापर्यंत ३० पेक्षा जास्त ड्रग्स पैडलर अटक झाले आहेत.

हे देखील वाचा