Wednesday, July 3, 2024

‘वा वा वा!’ छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने केला ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, म्हणाली ‘क्लब बंद…’

आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजाने सगळ्यांना घायाळ करणारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. ती तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असतो. निया शर्मा एक अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबत ती एक उत्तम डान्सर देखील आहे. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी तिच्या डान्स व्हिडिओमधून आलाच आहे. तसाच तिने आता एक तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्याला खूप कमी कालावधीत प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

निया शर्मा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो‌ आणि व्हिडिओ शेअर करत असत. तिने हा डान्स व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मिया कार्डी बी यांच्या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नियाने बार्बी पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. हा डान्स‌ व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.या डान्स व्हिडिओमध्ये यांच्यासोबत शिविका देखील दिसत आहे.

भारतामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने नाईट कर्फ्यू चालू केला आहे. त्यामुळे रात्रीचे कुठेही बाहेर फिरायला निर्बंध आहेत. त्यामुळे ती रात्रीचं आयुष्य खूप मिस करत आहे, असे तिने सांगितले. रात्रीचे सगळे क्लब बंद झाल्याने, तिला बाहेर कुठेही करता येत नाही. त्यामुळे तिने खंत व्यक्त केली आहे. तरीही ती म्हणते की, ‘क्लब बंद आहेत, पण माझा आतला आवाज मला असं सांगतोय की, डान्स करायला पाहिजे. म्हणूनच मी से
शिविका सोबत डान्स करत आहे.’

निया‌ शर्माचे सोशल मीडियावर खूप जास्त फॅन फॉलोविंग आहे. तिचे इंस्टाग्रामवर‌ 6 मिलियन म्हणजेच एवढे 60 लाख फॉलोवर्स आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील कमेंट दिले आहेत. चारूलने लिहिले आहे की, ‘तुझ्या इनर सोलने डान्स केला आहे वा वा वा.’ याआधी देखील तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.

नियाने ‘काली:एक अग्नीपरिक्षा’ या मालिकेमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले त्यामधील ‘एक हजारो में मेरी बहना है’ या सीरियलने तिला खूपच लोकप्रियता मिळाली. यासोबत ती के ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील स्पर्धक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिल्मफेअर अवॉर्डकडे पाहून मराठमोळ्या रितेश देशमुखने दिले भन्नाट एक्सप्रेेशन्स, पाहून तुम्हीही हसून हसून व्हाल लोटपोट

-भारतीय गायिकेचा अमेरिकेत डंका! नेहा कक्करच्या स्टेज परफॉर्मन्सने ह्युस्टनमधील प्रेक्षकांना पाडले होते नाचण्यास भाग, पाहा थ्रोबॅक व्हिडिओ

-‘बिग बॉस’चा माजी कंटेस्टेंट सिद्धार्थ शुक्लाने साधला पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा, म्हणाला ‘वा रे वा…’

हे देखील वाचा