Monday, July 1, 2024

उत्कृष्ट्य अभिनेत्री असून देखील तापसी पन्नूला कामासाठी पसरावे लागतात हात, स्वतः केला खुलासा

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu) सध्या खूप आनंदी आहे. शाहरुख खानसोबतचा तिचा पहिला चित्रपट डंकी सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अलीकडेच, मीडियाशी बोलताना तापसी पन्नूने तिची एक इच्छा व्यक्त केली. दिग्दर्शक नीरज पांडेसोबत पुन्हा काम करायला आवडेल, असे तिने सांगितले. तापसीने नीरज पांडेसोबत ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मध्ये काम केले आहे.

तापसी पन्नू म्हणाली, ‘मी त्यांना वारंवार भेटत राहते आणि जेव्हाही भेटते तेव्हा मी म्हणते, सर, तुम्ही दुसरे काही करता का? मी स्वत: तो चित्रपट सुरू करण्याची वाट पाहत आहे आणि मी त्या चित्रपटाचा भाग होऊ शकेन. किती वेळा सांगितलंय मला काम द्या सर.”

तापसी पुढे म्हणाली, ‘कदाचित नीरज यांना वाटेल की मी मस्करी करतीये, पण मला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. ‘बेबी’ चित्रपटात माझी केवळ सात मिनिटांची भूमिका होती. ‘बेबी’ नंतर त्यांनी मला ‘नाम शबाना’मध्ये साइन केले. मी पूर्णपणे नवीन होते आणि नीरजजींनी मला ही भूमिका ऑफर केली होती. माझ्यासाठी तो क्षण स्वप्नपूर्तीसारखा होता.

शेवटी तापसी म्हणते, ‘कोणत्याही दिग्दर्शकाकडून काम मागायला मी मागेपुढे पाहत नाही, पण नीरज पांडेसोबत माझी वेगळी केमिस्ट्री आहे. तो मला विसरु नये म्हणून मी पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येत राहतो. त्यांना माझा चेहरा आठवावा. तापसी पन्नूच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘वो लड़की है कहाँ’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ अभिनेत्याने उडवली होती राजेश खन्ना यांची झोप, 100 चित्रपट करूनही मिळाले नाही यश
राजेश खन्ना स्मृतिदिन: ज्या अभिनेत्रीने प्रेमाला नकार दिला तिच्याच घरासमोरुन काढली होती लग्नाची वरात

हे देखील वाचा