Friday, July 5, 2024

दसऱ्याला दिल्लीतील ‘लव कुश’ रामलीलामध्ये कंगना रणौतच्या हस्ते होणार रावण दहन, 50 वर्षांपासूनची बदलणार परंपरा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहन करणार आहे. लवकुश रलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

दिल्लीतील रामलीलामध्ये रावण दहनाचा व्हिडिओ स्वतः कंगनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने आपल्या चाहत्यांना 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा तेजस हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या 50 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी महिला रावणाच्या पुतळ्याचे दहन करेल. जय श्री राम.”

दिल्लीच्या लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या मते, सप्टेंबरमध्ये संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

“फिल्मस्टार असो किंवा राजकारणी, दरवर्षी एक व्हीआयपी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो,” त्यांनी पीटीआयला सांगितले. यापूर्वी आम्ही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला आहे. चित्रपट कलाकारांमध्ये अजय देवगण आणि जॉन अब्राहम आले आहेत.गेल्या वर्षी प्रभासने रावण दहन केले होते. आमच्या कार्यक्रमाच्या 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच एक महिला रावण दहन करणार आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात कंगनाने भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.कंगना राणौतचा पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘इमर्जन्सी’ पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अभिनेत्रीचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट चंद्रमुखी होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिशन सिंग बेदी यांच्या निधनाने बॉलीवूडमध्येही शोक, शाहरुख खानपासून संजय दत्तपर्यंत या स्टार्सनी वाहिली श्रद्धांजली
‘रामायण’ फेम अरुण गोविल सेटवर जखमी, जीपला धडकल्याने झाला अपघात

हे देखील वाचा