Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड पुनरागमनाची तयारी करतेय ईशा देओल ! विक्रम भट्टच्या सिनेमातून परतणार मोठ्या पडद्यावर…

पुनरागमनाची तयारी करतेय ईशा देओल ! विक्रम भट्टच्या सिनेमातून परतणार मोठ्या पडद्यावर…

ईशा देओल सध्या तिच्या पुनरागमनासाठी सज्ज होतेय. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी असलेली ईशा २००० च्या दशकांत काही चित्रपटांत दिसली होती. परंतु वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे ईशा चित्रपटांतून दूर होत गेली. भरत तख्तानीसोबतचे तिचे नाते यावर्षी तुटले. जवळपास १२ वर्षे संसार केल्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 

अशा कठीण काळातून गेल्यावर ईशाचे आयुष्य आता हळूहळू रुळावर येत आहे. विक्रम भट्टच्या चित्रपटातून ती पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘तुमको मेरी कसम’ असे या चित्रपटाचे नाव आहे.या चित्रपटाची निर्मिती विक्रम भट्ट करत आहेत. ईशासोबत यात अभिनेत्री अदा शर्मा, अनुपम खेर आणि इश्वाक सिंग देखील दिसणार आहेत. 

विक्रम भट्ट यांनी त्यांच्या एक-दोन नव्हे तर चार चित्रपटांची घोषणा केली आहे. ‘तुमको मेरी कसम’ व्यतिरिक्त ते ‘रण’, ‘विराट’, ‘तू मेरी पूरी कहानी’ असे चित्रपट बनवत आहेत. ‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटात ईशा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

ईशा चित्रपटांमध्ये परतण्यास तयार असल्याचे पाहून तिचे चाहते उत्सुक आहेत. कमेंट बॉक्समध्ये ईशाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. चाहते तिच्या लूकचेही कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खूप सुंदर, खूप सुंदर’. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तू खूप मजबूत आहेस. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

बॉयफ्रेंड सोबत तिरुपतीला गेली जान्हवी कपूर ! आईच्या जन्मदिनाचे औचित्य…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा