Sunday, May 19, 2024

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची धाड, पुण्यातील बंगल्यासह 98 कोटींची मालमत्ता जप्त

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती अभिनेता-उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची ९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 6600 कोटी रुपयांच्या बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडीने गुरुवारी सांगितले की, त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्ससह सुमारे 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हे प्रकरण बिटकॉइनच्या वापराद्वारे गुंतवणूकदारांची त्यांच्या पैशांची फसवणूक करण्याशी संबंधित आहे.

ईडीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर मुंबईतील जुहू येथील फ्लॅट आणि राज कुंद्राच्या नावावर पुण्यातील एक बंगला आहे. याशिवाय जप्त केलेल्या मालमत्तेत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की अंदाजे 97.79 कोटी रुपयांच्या या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार तात्पुरती संलग्नक आदेश जारी करण्यात आला आहे.

वन व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता. दरमहा १० टक्के परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन बिटकॉईनच्या रूपात लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आरोपींवर आहे.

प्रवर्तकांनी गुंतवणुकदारांची फसवणूक केली आणि अस्पष्ट ऑनलाइन वॉलेटमध्ये बेकायदेशीरपणे मिळवलेली बिटकॉइन लपवून ठेवल्याचा आरोप ईडीने केला आहे. शिल्पा शेट्टी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. त्याचवेळी तिचा पती राज कुंद्रानेही फिल्मी दुनियेत प्रवेश केला आहे. राज कुंद्राने गेल्या वर्षी ‘UT69’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राघव चड्ढासोबत लग्न केल्यानंतर परिणीतीला राजकारणात इंटरेस्ट, पण पतीबद्दल केली ही तक्रार
गाण्याच्या शूटिंगच्या एक दिवस अगोदर आयशा खानला केले रिप्लेस, बोर्डाच्या परीक्षा सोडायला होती तयार

हे देखील वाचा