Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ईडीने बजावले समन्स

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ईडीने बजावले समन्स

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचा त्रास काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ईडीने सोमवारी अश्लील चित्रपटांच्या बेकायदेशीर वितरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राज कुंद्राच्या नावावर नवीन समन्स जारी केले. अधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

राज कुंद्रा सोमवारी ईडीसमोर हजर होणार होते, मात्र त्यांनी हजर राहण्यासाठी नवीन तारीख मागितल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कुंद्राला ४ डिसेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही लोक सामील असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील एका व्यावसायिकाचा समावेश असून त्याला ४ डिसेंबरला समन्स बजावण्यात आले असून अभिनेत्री गेहाना वशिष्ठला ९ डिसेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

29 डिसेंबर रोजी, ईडीने कुंद्राच्या मुंबईतील परिसर आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये असलेल्या इतर व्यक्तींच्या परिसरावर छापे टाकले. कुंद्रा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाचे ते “पूर्णपणे पालन” करत आहेत.

कुंद्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा हा दुसरा खटला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने क्रिप्टोकरन्सी प्रकरणात कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची ९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मात्र, मालमत्ता जप्तीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून या दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी व्यावसायिकासह इतर काही जणांना अटक करण्यात आली होती, त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, ‘हॉटशॉट्स’ ॲपचा वापर आरोपी अश्लील मजकूर अपलोड आणि स्ट्रीम करण्यासाठी करत होते. कुंद्राचा दावा आहे की तपासकर्त्यांकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि ते आपल्याला खोटे ठरवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

शहीद कपूरचे हे आगामी सिनेमे ठरू शकतात मोठे हिट; एका सिनेमात साकारणार रफ टफ पोलीस अधिकारी…
जवानने जपान देखील गाजवलं; शाहरुख खानने मानले चाहत्यांचे आभार…

हे देखील वाचा