Monday, July 1, 2024

Nusrat jahan ED notice | अभिनेत्री नुसरत जहाँ यांना इडीकडून पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nusrat jahan ED notice |फ्लॅट विक्री घोटाळा प्रकरणात अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. त्यांना १२ सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भाजप नेते शंकुदेव पांडा यांनी तक्रार केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने नुसरत जहाँविरोधात गुन्हा दाखल केला.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ (nusrat jahan) या सेव्हन सेन्सेस इंटरनॅशनल या रिअल इस्टेट कंपनीच्या संचालिका होत्या, त्यांनी कोलकात्याच्या बाहेर कमी दरात निवासी सदनिका देण्याचे आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची अनेक कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मात्र, आरोप फेटाळून लावत जहानने यापूर्वी 2017 मध्ये कंपनीचा राजीनामा दिल्याचे सांगितले होते.

तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी या संदर्भात 7 सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कॉर्पोरेट कंपनीचे दुसरे संचालक राकेश सिंग यांनाही समन्स बजावले आहे. दोघांना 12 सप्टेंबर रोजी कोलकात्याच्या उत्तर सीमेवरील सॉल्ट लेकमधील सेंट्रल एजन्सीच्या सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस (CGO) परिसरात हजर राहण्यास सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
राकेश रोशन यांनी ‘या’ कारणासाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले नाही काम
गायक नाहीतर ‘हे’ होते हार्डी संधूचे स्वप्न, एका अपघाताने बदलला निर्णय

हे देखील वाचा