बॉलिवूडच्या चकाकणाऱ्या जगाची अशी काही रहस्ये आहेत, जी उघडकीस आली आहेत. मात्र, बदलली नाहीत. ग्लॅमरने भरलेल्या या जगात एक सत्य आहे कास्टिंग काऊच, ज्याच्या वेदना बर्याच कलाकारांनी सहन केल्या आहेत. बर्याचदा काही कलाकार, कास्टिंग काऊचशी संबंधित आपला अनुभव शेअर करतात. नुकतीच ‘कहीं है मेरा प्यार’ फेम अभिनेत्री ईशा अग्रवालनेही तिच्या कास्टिंग काऊचची कहाणी सांगितली.
मिस ब्यूटी टॉप ऑफ वर्ल्ड २०१९ ची पदवी जिंकणार्या ईशा अग्रवालने, एका मुलाखतीत याचा खुलासा केला. ती म्हणाली, “करमणूक जगात माझा प्रवास सोपा नव्हता. यात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लातूरसारख्या छोट्या गावातून येऊन, मुंबईमध्ये नाव कमावणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही.”
कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ईशा म्हणाली, “आजही हे सत्य आहे. जेव्हा मी मुंबईला नवीनच आले होते, तेव्हा एका कास्टिंग व्यक्तीने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले. जेव्हा मी माझ्या बहिणीसोबत त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले, तेव्हा तो म्हणाली की, त्याने मोठमोठ्या कलाकारांना कास्ट केले आहे आणि मलाही एक चांगला प्रकल्प देईल.”
ईशा पुढे म्हणाली, “अचानक त्याने मला माझे कपडे काढायला सांगितले. कारण त्याला माझे शरीर बघायचे होते. यामागचे कारण त्याने असे सांगितले की, माझे शरीर पाहिल्यानंतर तो ठरवेल की, मी भूमिकेसाठी योग्य आहे की नाही. मी ताबडतोब त्याची ऑफर नाकारली आणि माझ्या बहिणीसोबत तेथून निघून गेले. त्याने मला कित्येक दिवस मॅसेज केले, पण नंतर मी त्याला ब्लॉक केले.”
एवढेच नव्हे, तर ईशाने नायक- नायिका बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांनाही सल्ला दिला. ती म्हणाला, “तुम्हाला पुष्कळ लोक सापडतील, जे असे म्हणतील की, ते एका मोठ्या कास्टिंग कंपनीतून आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. ते तुम्हाला बर्याच ऑफर देतील, परंतु तुम्ही या जाळ्यात अडकू नका. नेहमीच योग्यच निवडा, तुमची क्षमता असल्यास तुम्हाला नक्कीच कोणत्याही तडजोडीशिवाय यश मिळेल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक
-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर
-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक