Thursday, April 18, 2024

‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम तरला जोशी यांचे निधन; निया शर्मासह इतर कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

टेलिव्हिजनवरील ‘एक हजारो में मेरी बहना है’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील बहिणींचे प्रेम पाहून प्रत्येक घरातील बहिणींमधील प्रेम जागे झाले होते. याच मालिकेच्या संदर्भात एक दुखः द बातमी समोर आली आहे. या मालिकेत बडी बिजी हे पात्र निभवणाऱ्या अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. रविवारी (६ जून) सकाळी तरला यांना हृदयविकाराचा झटका आल्याने, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे, तर त्यांच्या परिवाराला धीर दिला आहे. या मालिकेत सध्या चर्चेत असणारी बोल्ड अभिनेत्री निया शर्मा देखील होती.

त्यांच्या निधनाची बातमी नियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून दिली आहे. एक फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुमच्या आत्म्यास शांती लाभो बडी बीजी. मला तुमची खुप आठवण येत राहील.” नियासोबत कुशाल टंडन, करण टॅकर, क्रिस्टल डिसुझा या कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी देखील सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून त्यांच्या “आत्म्याला शांती लाभो” असे लिहिले आहे.

तरला जोशी यांनी‌‌ ‘एक हजारो मैं मेरी बहना है’ व्यतिरिक्त ‘साराभाई vs साराभाई’, ‘बंदिनी’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी तरला जोशी यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तरला जोशी यांनी ‘गांधी माय फादर’, ‘मजियारा है’ आणि ‘हम जो ना कहेना चाहे’ या सारख्या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा