अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे बॉलिवूड आणि टीव्ही जगत संपूर्ण हादरून गेलं आहे. प्रत्येकजण त्याची आठवण काढून भावुक होताना दिसत आहे. सिद्धार्थचे चाहते सतत त्याच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने इतरांप्रमाणे एकता कपूरलाही मोठा धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर लिहिले की, सिद्धार्थच्या मृत्यूने ती अक्षरश: सुन्न झाली आहे.
सोशल मीडियावर सिद्धार्थच्या मृत्यूसोबतच युजर्सना सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचीही आठवण येत आहे. याचे कारण म्हणजे की, या दोन्ही कलाकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्हीपासून केली आणि नंतर चित्रपटांकडे वाटचाल केली. एकता कपूरने सिद्धार्थला अंतिम निरोप देत, एक भावनिक नोट शेअर केली आहे. तिने सिद्धार्थ शुक्लाचा एक फोटोही शेअर केला आहे. दरम्यान सिद्धार्थने अलीकडेच एकता कपूरच्या ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीसाठी बनवलेल्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण केले होते. (ekta kapoor remembers siddharth shukla and wrote a post)
सिद्धार्थचा फोटो शेअर करत एकताने लिहिले की, ‘कालपासून स्तब्ध आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच आतमधुन शून्याची भावना येत आहे. ‘अगस्त्य’ची कथा अशी संपेल, असे कधी वाटले नव्हते. कुटुंबाला दु: खाच्या वेळी धैर्य मिळो. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो, सिद्धार्थ.” एकता कपूरचे सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत या दोन्ही अभिनेत्यांशी खूप चांगले संबंध होते. तिनेच सुशांतला ‘किस देश में है मेरा दिल’ या शोद्वारे दूरदर्शनवर पहिला ब्रेक दिला होता.
सिद्धार्थ शुक्ला गुरूवारी (२ सप्टेंबर) रोजी त्याच्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळला. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थला त्याची आई रीता शर्मा यांनी अग्नी दिली. यावेळी टीव्ही जगतातील अनेक कलाकार त्याच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…