नागीन हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) या शोमध्ये अनेक अभिनेत्रीने काम केले आहे. त्यांना यामुळे चान्गलिसिज लोकप्रियता मिळाली आहे. अशातच एकता कपूरने या शोबाबत एक मोठ खुलासा केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले होते की, तिला या संकल्पनेवर खरतर सिनेमा बनवणार होती. याबाबत तिने एका बॉलिवूड अभिनेत्रीशी संवाद साधला होता आणि तिने या प्रोजेक्टसाठी होकार देखील दिला होता. परंतु तिने सिनेमा ना बनवता सीरिअल का बनवली याबाबत तिने आता खुलासा केला आहे. आता तिने नक्की असे का केले आणि कोणत्या अभिनेत्रीसोबत चर्चा केली होती ते जाणून घेऊया.
एकता कपूर अलीकडेच उषा काकडे प्रॉडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टवर दिसली. तिने नागिन मालिकेबद्दल चर्चा केली. तिने स्पष्ट केले की, “मला सुरुवातीला नागिन नावाचा चित्रपट बनवायचा होता. मी या कथेबद्दल दोन प्रमुख कलाकारांशी बोलले देखील होते. या प्रोजेटसाठी एका अभिनेत्रीने होकार दिला होता, तर दुसरीने नकार दिला. हो म्हणणारी अभिनेत्री अमेरिकेत गेली. तेव्हाच मी नागिनला टेलिव्हिजन शोमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.”
एकताने यावेळी अभिनेत्रींची नावे उघड केली नाहीत. परंतु आधीच्या मुलाखतीत एकताने अभिनेत्रींची नावे उघड केली होती. तिने नंतर सांगितले होते की तिने “नागिन” चित्रपटाची कल्पना प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत शेअर केली होती. फिल्म कंपॅनियनला दिलेल्या आधीच्या मुलाखतीत एकता म्हणाली होती, “‘डर्टी पिक्चर’ नंतर मी एका नागाबद्दल चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मी ही संकल्पना दोन अभिनेत्रींना देण्याचा विचार केला.
तिने माझ्याकडे पाहिले आणि मला वाटले की मी खूप उत्साही आहे. ती म्हणाली, “तू खरोखर असा विचार करत आहेस का? आजच्या काळात तुला ‘नागिन’ नावाचा चित्रपट बनवायचा आहे का? लोक तो पाहतील का?” मग मी प्रियांका चोप्राकडे गेलो. ती त्याच सुमारास परदेशात जात होती.” आता, या दोन्ही विधानांना एकत्रित करताना असे दिसते की एकताचा चित्रपट करण्यास सहमती देणारी अभिनेत्री दुसरी तिसरी तिसरी तिसरी तिसरी कोणी नसून प्रियांका चोप्रा होती. तथापि, नंतर प्रियांका अमेरिकेत गेली, ज्यामुळे एकताचा चित्रपट अडकला.
नागिनचा नवीन सीझन सध्या प्रसारित होत आहे. या मालिकेत प्रियांका चहर मुख्य भूमिकेत आहे. नागिनचा पहिला सीझन २०१५ मध्ये प्रसारित झाला. त्यात मौनी रॉय आणि अर्जुन बिजलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत मौनी रॉयने नागिनची भूमिका साकारली होती. हा पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










