बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या नंतर जर कुणाच्या लग्नाची चिंता लोकांना सतावत असेल तर ती आहे एकता कपूर ची! हिंदी मालिका विश्वावर एकछत्री अंमल असणारी एकता हीचं मालिका विश्वावर इतका जबरदस्त आहे की हीचा शब्द हा अखेरचा शब्द मानला जातो.
आज हिंदी मालिका विश्वातील ६० ते ७० टक्के मालिका या एकट्या एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स या प्रोडक्शन हाऊसच्या आहेत. मग आता हिला मालिका विश्वाची राणी का म्हणू नये? मग या राणीच्या आयुष्यातील राजकुमार कोण? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि ते तिला विचारतात देखील. परंतु ती या प्रश्नांना बऱ्याचदा टाळते. तर काही वेळा मी एकटी खुश आहे असं सांगून समोरच्यांना गप्प करून टाकते. पण जर थांबा एकताच्या आयुष्यात देखील कुणीतरी असं आलं आहे ज्याबद्दल तिने अजून अधिकृत रित्या वाच्यता जरी केली नसली तरी सुद्धा तिच्या हालचाली त्याच दिशेने असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण आहे हा भाग्यवान? चला तर मग जाणून घेऊयात.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता हिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. आतापर्यंत या मालिकांच्या माध्यमातून तिने चिक्कार पैसा देखील कमावला आहे. पण ती याच कामात इतकी गुंतली आणि आनंदी राहिली की तिला एखाद्या जोडीदाराची कधी गरजच भासली नाही असं ती स्वतःच बऱ्याचदा मुलाखतींमधून सांगत असते. सध्या एकता ४५ वर्षांची आहे आणि आता कुठे जाऊन तिचे सुत जुळू लागले आहेत. एकतानेच तिचा मित्र तन्वीर बुकवाला याच्यासोबत सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर करत “आणि आम्ही इथे आहोत. लवकरच आपल्याला देखील बातमी देऊ” असं कॅप्शन दिलं आहे.
एकताने शेअर केलेल्या या फोटोवर तन्वीर ने ” या मैत्रीला आता नातेसंबंधांमध्ये बदलण्याची वेळ आली आहे” अशी कंमेंट केली आहे. दोघांचे सोशल मीडिया अकाऊंट्स वर चेक केलं तर एकमेकांच्या फोटोनीच यांची गॅलरी भरलेली आहे. त्यांच्या या बॉंडिंगमुळे एकता आणि तन्वीर हे दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु हेही खरं आहे की दोघांनी अजूनही याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
तन्वीर बुकवाला हा लेखक आहे तसंच डिंग एंटरटेनमेंट या कंपनीचा तो संस्थापक देखील आहे. त्याने बऱ्याचदा एकता सोबत एकत्र काम केलं आहे. वेब शो फितरत साठी त्याने एकता कपूर सोबत कोलॅबरेट केलं होतं.
एकताबद्दल आणखीन एक खास माहिती द्यायची झाली तर ती लग्न न करताच आई झाली आहे. जानेवारी २०१९ मध्ये तिने सरोगसी द्वारे मुलाचं मातृत्व स्वीकारलं आहे. आपल्या मुलाचं नाव तिने रवी ठेवलं आहे. जे तिचे वडील जितेंद्र यांचं मूळ नाव आहे. एकता चा भाऊ तुषार देखील असाच सरोगसी द्वारे एक मुलीचा पिता झाला असून त्याने देखील लग्न केलेलं नाही.