टेलिव्हिजन क्वीन आणि बॉलिवूडच्या हिट चित्रपटांची निर्माती करणारी एकता कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बहुतकरून आपल्या नवीन मालिकांसाठी चर्चेत येणारी एकता आता तिच्या आगामी चित्रपटांसाठी चर्चेत आली आहे. २०१० साली एकता कपूरने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीसोबत मिळून एक एक्सपेरिमेंटल सिनेमा तयार केला होता. या सिनेमात तिने डिजिटल तंत्रज्ञानाचा परिणाम दाखवला होता. चित्रपटाचे नाव होते लव्ह सेक्स और धोका. यात एमएमएस स्कँडल, ऑनर किलिंग आणि स्टिंग ऑपरेशनसोबत अनेक रंजक गोष्टी दिसल्या. आता मिळणाऱ्या माहितीनुसार एकता कपूर लवकरच बिग बॉसमध्ये दिसणार असून, ती या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा तिथे करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार एकता कपूर बिग बॉसच्या आगामी भागांमध्ये ती या शोमध्ये दिसेल आणि तिच्या आणि दिबाकर बॅनर्जी यांच्या बालाजी टेलीफिल्म्सच्या आगामी ‘लव्ह सेक्स और धोका २’ सिनेमाची घोषणा करेल. यासाठी एकता बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. हे सर्वांसाठी एक सरप्राईज असेल. बिग बॉस १६ ला मिळणारी तुफान लोकप्रियता बघता निर्मात्यांनी ही एक संधी समजत या शोला चार आठ्वड्यानी वाढवले आहे. अनेक निर्मात्यांसाठी आता हा शो एक मार्केटिंग संधी बनला असून, एकताला ही संधी घालवायची नाहीये. त्यामुळे तिला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे.
तत्पूर्वी २०१० साली या सिनेमातून राजकुमार राव आणि नुसरत भरूचा आदी कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाली होती. दोन कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जवळपास १० कोटींची कमाई केली होती. आता हेच पाहायचे की या मिळणाऱ्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भांडं फुटलं रे! तुषार कालियाने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, फाेटाे झाले व्हायरल
सतत टीव्हीवर ‘सूर्यवंशम’ पाहून वैतागलेल्या पठ्याने थेट लिहिले चॅनेलाच पत्र, म्हणाला…