Thursday, June 26, 2025
Home वेबसिरीज एकता कपूर आणि शोभा कपूरने दिला ऑल्ट बालाजीच्या सर्व पदांचा राजीनामा

एकता कपूर आणि शोभा कपूरने दिला ऑल्ट बालाजीच्या सर्व पदांचा राजीनामा

प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका डेलीसोप क्वीन एकता कपूरने नुकताच सर्वांना एक मोठा झटका दिला आहे. एकता कपूर आणि तिची आई असलेल्या शोभा कपूर यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या ऑल्ट बालाजीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अचानक आलेल्या या मोठ्या बातमीमुळे फॅन्ससोबतच इंडस्ट्रीला देखील मोठा धक्का बसला आहे. या राजीनाम्याची बातमी खुद्द एकता कपूरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

एकता कपूरने १० फेब्रुवारी रोजी सकाळी एक पोस्ट शेअर करत ऑल्ट बालाजीच्या मॅनेजमेंट टीममध्ये मोठे बदल झाल्याची घोषणा केली. एकता कपूरने या प्लॅटफॉर्मची मुख्यपद सोडताना नवीन चीफ बिजनेस ऑफिसरच्या नावाची घोषणा केली आहे. आता एकता कपूरने सांगितले की, ऑल्ट बालाजीचे चीफ बिजनेस ऑफिसर म्हणून विवेक कोका कार्यभाग सांभाळतील. एकताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मागच्या वर्षीच याची प्रक्रिया सुरू झाली होती. आता आज ऑल्ट बालाजीकडे नवीन फ्रेश टीम आहे. दुसऱ्या बऱ्याच गोष्टींवर लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, आता विवेक कोका हे ALTBalaji चे नवीन चीफ बिझनेस ऑफिसर असतील. कोका यांच्या नेतृत्वाखाली, ALTBalaji प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा, फ्रेश कॉन्टेंट देण्याचे काम चालू ठेवतील.” यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ” खूप शुभेच्छा टीम ऑल्ट नवीन मॅनेजमेंटचे स्वागत करु.”

एकताने २०१७ साली ऑल्ट बालाजी सुरु केले होते. फ्रेश आणि युनिक कन्टेन्टसाठी हा प्लॅटफॉर्म ओळखला जात होता. त्यानंतर यावर एकापाठोपाठ एक बोल्ड सीरिज आल्या. कंगना रणौतचा कॉंट्रोव्हर्शियल शो ‘लॉकअप’ यावरच आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

हे देखील वाचा