सध्या सर्वत्र प्राण्यांचा एक मनोरंजन म्हणून वापर केला जातो. अनेकदा मनोरंजनासाठी प्राण्यांवर अन्याय केला जातो. पण काहीवेळा प्राण्यांकडून असे काही केले जाते, ज्यामुळे सर्वत्र चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे पुन्हा एकदा झाले आहे. ज्याचा व्हिडिओ अभिनेत्री ऍमी जॅक्सनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत दिसते की, एका हत्तीला रस्त्याच्या कडेला साखळीने बांधलेले आहे. तेवढ्यात एक माणूस वाटेने जातो आणि हत्ती त्याच्या सोंडेने त्याला मागे ढकलतो. हा व्हिडिओ कुणाचाही तुमचाही थरकाप उडेल. हाच व्हिडिओ शेअर करताना ऍमीने (Amy Jackson) लिहिले की, “कृपया शेअर करा आणि प्राण्यांवर होणारा क्रूरपणा थांबवण्यात आम्हाला मदत करा. वन्य प्राण्यांना साखळीने बांधू नये याचे हा व्हिडिओ ताजे उदाहरण आहे. या प्राण्यांचा वापर मनोरंजनासाठी केला पाहिजे का? हा गरीब हत्ती आपल्या कुटुंबासोबत असावा, त्याला गुलाम बनवू नये.”
ऍमी जॅक्सनने पुढे लिहिले की, “हा हत्ती पर्यटकांचे मनोरंजन करायचा आणि त्यामुळे तो रागावला यात आश्चर्य नाही. कृपया चांगल्या कारणासाठी तुमचे सोशल प्लॅटफॉर्म वापरा. हे तुमचे मित्र, कुटुंब आणि सेलिब्रिटी आणि वृत्त माध्यमांसह शेअर करा. जागरूकता वाढवण्यासाठी आणि ही प्राण्यांची क्रूरता थांबवण्यासाठी हे शेअर करणे आवश्यक आहे. प्राण्यांचा वापर करणाऱ्या कोणत्याही शो किंवा सर्कससाठी पैसे देऊ नयेत याची आठवण करून देण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. कारण या प्राण्यांवर अत्याचार केले जातात आणि त्यांचा आत्मा प्रदर्शन करण्यासाठी तोडला जातो…प्राण्यांच्या बाबतीत असे होऊ देऊ नका.”
ऍमीचा हा व्हिडिओ ९ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला १ लाखाहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. हजारो कमेंट्सचाही या व्हिडिओवर वर्षाव झाला आहे. काही युजर्स तिचे समर्थन करतायत, तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
ऍमी एक ब्रिटिश-भारतीय मॉडेल-अभिनेत्री आहे. फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ऍमीने मिस टीन २००८ चा खिताब जिंकला होता. यानंतर २०१० मध्ये तिने ‘मिस इंग्लंड’ स्पर्धेतही भाग घेतला पण तिला अंतिम टप्पा पार करता आला नाही. ऍमी हिंदी चित्रपटसृष्टीत ती कमाल दाखवू शकली नाही, पण ती दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे.
ऍमीने २०१२ मध्ये ‘एक दीवाना था’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा चित्रपट विशेष ठरला नाही आणि या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खावा लागला. या चित्रपटात ऍमीच्या सोबत प्रतीक बब्बर दिसला होता. मात्र, यानंतर ऍमीने आपले चित्रपट करिअर करण्यासाठी पुढे पाऊल टाकले. ऍमीने ‘आय’ या तमिळ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत पुनरागमन केले.
ऍमी जॅक्सनने तमिळ, हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऍमी जॅक्सन ‘तेरी’, ‘२.०’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘येवडू’ आणि ‘देवी’मध्ये दिसली आहे.
हेही वाचा-
- एँजल रितीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून मुळ ‘पुष्पा’ला विसराल, तब्बल ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज | Viral Video
- पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार मानव अर्चनाची प्रेमकहाणी, ‘पवित्र रिश्ता…इट्स नेवर टू लेट’चा ट्रेलर प्रदर्शित
- खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भुमिकेत! WHY I KILLED GANDHI चित्रपटाचा ट्रेलर रिलीज