अभिनय क्षेत्रामध्ये एखादा चित्रपट हिट होण्यासाठी फक्त स्टोरी चांगली असून चालत नाही, त्यासाठी कलाकारांनी दमदार अभिनय करणे देखील गरजेचे आहे. अनेक चित्रपट तर असे असतात की, त्यांना काहीच स्टोरी नसते. परंतु त्यातील मसालेदार आणि रोमँटिक सीनमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. अशा चित्रपटांमध्ये किसिंग सीनसाठी ओळखला जाणारा इमरान हाश्मी आता एका गोष्टीला वैतागला आहे आणि ते ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी म्हणाला की, “माझ्या चित्रपटाच्या कारकिर्दीमध्ये मी जास्त किसिंग सीन असलेलेच चित्रपट केले आहेत. त्यामुळे अनेकांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की, मी माझ्या चित्रपटातील प्रत्येक हिरोईनला किस करत असतो. गेली 10 वर्षे मी हेच काम करत आहे. त्यामुळे आता मी स्वतःला ‘ सिरीयल किसर’ हा टॅग दिला आहे.” इमरानने हा टॅग गमतीमध्ये दिला होता, पण आता त्याच्या या टॅगमुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.
View this post on Instagram
इमरान आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला की, “मी आता किस सीन करून थकलो आहे. प्रत्येक हिरोईनला किस करून आता मी थोडा कमजोर झाल्याचे मला जाणवत आहे. माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत होते. परंतु मला असं वाटत होतं की, माझ्यामध्ये एक अभिनेता आहे, ज्याला काहीतरी वेगळं पाहिजे.”
इमरानने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत, ज्यामध्ये ‘मर्डर’, ‘गॅंगस्टर’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘मर्डर 2’, ‘जन्नत 2’ अशा अनेक रोमँटिक आणि हॉरर चित्रपटांमध्ये त्याने आपल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला ‘शंघाई’ आणि ‘टायगर्स’ या चित्रपटांमधून देखील चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. त्याने अरमान मलिकने गायलेल्या ‘मे रहू या ना रहू’ या अल्बम सॉंगसाठी अभिनय केला होता. त्याच्या या गाण्यालादेखील प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.(emraan hashmi reveals who tagged him serial kisser and why)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंदवार्ता! धर्मेंद्रचा नातू ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात, प्रेयसी द्रीशासोबत घेणार सात फेरे
रविवारी जलसाचे गेट चाहत्यांसाठी बंद, बिग बींनी चाहत्यांना दिला माेठा इशारा, जाणून घ्या कार