Monday, March 4, 2024

फक्त ‘सीरियल किसर’च नाही, तर जबरदस्त बॉडी बिल्डरही आहे इमरान हाश्मी; एकदा व्हिडिओ पाहाच

सिनेमांव्यतिरिक्त  सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्यांमध्ये इमरान हाश्मी या अभिनेत्याचाही समावेश होतो. ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा इमरान याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे.

अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो त्याची बॉडी आणि ऍब्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच बॉलिवूड कलाकारही खुश झाले आहेत.

इमरान हाश्मीच्या व्हिडिओत दिसते की, त्याने कशाप्रकारे काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि मॅचिंग बूट परिधान करत वर्कआऊट करत आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “एअरब्रश केलेल्या चित्रांनी भरलेल्या जगात माझे नैसर्गिकता मिळवणे छान आहे…!!” यासोबतच त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये #NaturalBodybuilding #Bulking #BodyTransformation या हॅशटॅग्जचाही वापर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

दिग्दर्शक मोहित सूरी यांनाही आवडला व्हिडिओ
इमरान हाश्मीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताच या व्हिडिओवर चाहत्यांपासून त्याच्या मित्रांपर्यंत सर्वांनी कमेंट करत त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची प्रशंसा केली. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांनी त्याला ‘दमदार’ आणि ‘शानदार’ असे म्हटले आहे. तसेच, दिग्दर्शक मोहित सूरी यांनी केंट करत लिहिले की, “खराखुरा हिरो… माझा भाऊ.” मोहित सूर हे त्यांच्या ‘जहर’, ‘कलयुग’, ‘आवारापन’, ‘मर्डर २’, ‘आशिकी २’ यांसारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी इमरान हाश्मीच्या अधिकतर सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

इमरान हाश्मीचे आगामी सिनेमे
इमरान हाश्मीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो मनीष शाह दिग्दर्शित ‘टायगर ३’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. वृत्तानुसार, सिनेमात इमरान खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. मात्र, निर्मात्यांकडून यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा