Thursday, May 23, 2024

बापरे…बाप! संजय दत्तसोबतच्या अफेअरमुळे ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितला करावी लागली होती चक्क ‘या’ कागदावर सही

बॉलिवूडमध्ये आज अनेक प्रकारच्या करारावर बर्‍याचदा अभिनेत्री स्वाक्षरी करतात, ज्यात काही विशिष्ट अटी असतात. यात गर्भधारणा संदर्भातल्या अटी आणि नियम असतात, ज्या बर्‍याचदा चित्रपटातील नायिकांसोबत साईन केला जातो. या चित्रपटाच्या दरम्यान त्या अभिनेत्री गर्भवती होऊ शकत नाहीत. कारण या चित्रपटाच्या प्रतिमेवर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो, किंवा त्या गर्भधारणेमुळे चित्रपटाचे काम थांबू शकते. तथापि, पूर्वीच्या काळात हे अजिबातच सामान्य नव्हते. त्या काळात कुमारिका अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याकडून गर्भधारणेसंदर्भातल्या कागदावर स्वाक्षरी करून घेतल्यानं, सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. शनिवारी (15 मे) ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 15 मे, 1967 साली मुंबईत झाला होता. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याकडून गर्भधारणेसंदर्भात करून घेतलेल्या स्वाक्षरीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

‘हमको आज कल है’ फेम तसेच ‘धकधक गर्ल’ म्हणून नावाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यावर आजही सारे जग फिदा आहे. आपल्या सुंदर अभिनय व नृत्याने तिने साऱ्या जगाला आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे. हिचे चित्रपट सुपरहिट असायचे, आणि सुपरस्टार संजय दत्तबरोबरची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीदेखील सगळ्यांना कायमच आवडली. तथापि, पडद्यामागेही हे जोडपे एकमेकांच्या अगदी जवळ आले होते, याची जाणीव सर्वांना आहे.

सन 1993मध्ये जेव्हा खलनायक हा चित्रपट आला, तेव्हा संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख भूमिकेत होते. हा काळ होता, जेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी जोरात सुरू होती. या दोघांच्या कथेविषयी प्रत्येकाला माहिती होते. संजय आणि माधुरीचे लग्न होणार आहे, असेही म्हटले जात होते. याव्यतिरिक्त असे म्हटले जाते की, माधुरी संजयच्या अतिशय जवळ असल्यानं गर्भधारणेसंदर्भातल्या कागदावर स्वाक्षरी केली, जेणेकरून माधुरी आणि संजयचा चित्रपटावर कोणताही परिणाम होऊ नये.

या कलमावर माधुरीने सही केली, पण संजयबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल काही बोलले नाही. तथापि, त्यांच्या प्रेमकथेच्या समाप्तीची सुरूवातही या चित्रपटापासून झाली. या चित्रपटादरम्यान बॉम्बे ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले, आणि त्याला तुरुंगात जावे लागले. वादापासून दूर राहिलेल्या माधुरी दीक्षितने हे सर्व पाहिल्यानंतर संजयपासून अंतर ठेवले. यानंतर या दोघांमधील अंतर इतके वाढले की, त्यांनी 21वर्षे एकत्र काम केले नाही.

संजय आणि माधुरी सुमारे 20-21 वर्षानंतर ‘कलंक’ चित्रपटात दिसले. करण जोहरच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण संजय आणि माधुरीला एकत्र पाहण्यास प्रेक्षकांनी नक्कीच रस दाखविला. या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचा अभिनय होता.(entertainment bollywood dhak dhak girl actress madhuri dixit had to sign no pregnancy clause due to affair with sanjay dutt)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिनाची डुप्लिकेट असूनही झरीनला झाला नाही त्याचा फायदा, फ्लॉप चित्रपटांमुळे झाली बॉलिवूडपासून दूर

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित थिरकली ‘या’ गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा