Tuesday, July 9, 2024

एकेकाळी दम्याने त्रस्त असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे बोल्ड फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, ‘पाण्याला आग लावली’

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तसेच चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी नेहा काहीना काही मनोरंजक पोस्ट देखील करत असते.

त्यातही अभिनेत्रीच्या बोल्ड अदा हे तिच्या चाहत्यांसाठी अकर्षणाचे केंद्रच आहे. अलीकडे अशाच काही कारणांमुळे नेहा जबरदस्त चर्चेत आली आहे.

नेहाने अलिकडेच तिचे काही बिकिनी बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्यातील एक फोटोमध्ये नेहाने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. समुद्राच्या लाटांवर स्वैर होणाऱ्या नेहाचे सौंदर्य यात अगदी खुलून दिसत आहे. नेहा शर्माने तिचे हे बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत तिने फोटोला ‘गेल्या वर्षी या वेळी …’ असे कॅप्शन दिले आहे. नेहा शर्माने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की तिचे फोटो तिची बहीण म्हणजे अभिनेत्री रितिका शर्माने काढला आहे.

 

आपल्याला ठाऊक आहे का की, इतकी बोल्ड आणि सुंदर दिसणारी नेहा ही बिहारमध्ये भगलपूर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार अजित शर्मा यांची लेक आहे. वडिलांच्या प्रचार सभांमध्येही नेहा हिरीरीने सहभागी होत असते.

नेहाला लहानपणी अस्थमाचा त्रास होत असे, त्यामुळे ती नेहमीच अशक्त आणि दुर्बल असल्याचे तिने स्वतः माध्यमांसमोर कबूल केलंय. कुटुंबाच्या साथीमुळे आणि त्यांच्या आशिर्वादांमुळे हैदराबादमध्ये उपचार घेऊन ती अस्थमा या आजारातून पूर्णपणे बरी झाल्याचेही तीने सांगितलं होतं.

हे देखील वाचा