Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

“रिलीज होण्यापूर्वी मजा आली, पण…”; हिरोपंती 2 बद्दल टायगर श्रॉफचे खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ(Tiger Shroff) शेवटचा ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटात टायगरसोबत तारा सुतारिया(Tara Sutaria) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत दिसले होते. टायगर नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत असतो. अलीकडेच टायगरने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन केले. ज्यामध्ये त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जेव्हा एका चाहत्याने टायगरला त्याच्या हिरोपंती 2 चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा त्याने त्याच्या खराब कामगिरीबद्दल सांगितले होते.

इंस्टाग्रामवर आस्क मी सत्रादरम्यान, एका चाहत्याने टायगरला विचारले, तुला हीरोपंती करताना कसे वाटले? याला उत्तर देताना टायगर म्हणाला, ‘रिलीजपूर्वी खूप मजा आली… रिलीजनंतर, लग गये.’

हे आवडते साऊथ स्टार्स आहेत
या सत्रात एका चाहत्याने टायगरला त्याच्या आवडत्या साऊथ अभिनेत्याबद्दल विचारले. अल्लू अर्जुन हा टायगरचा आवडता साऊथ स्टार आहे. त्याने प्रतिसादात लिहिले की आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुन आहे.

टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती 2’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अवघ्या 24 कोटींचा व्यवसाय करू शकला. 2014 मध्ये आलेल्या ‘हिरोपंती’ चित्रपटाचा हा सिक्वेल होता. ज्याद्वारे टायगरने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हिरोपंतीमध्ये टायगरसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसली होती.

टायगर लवकरच ‘गणपत पार्ट 1’ या चित्रपटात क्रिती सेनॉनसोबत दिसणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो अक्षय कुमारसोबत छोटे मियाँ बडे मियाँमध्ये दिसणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची पहिली ‘स्टंटगर्ल!’ ‘बसंती’ बनून धोकादायक सीन शूट करताना मरता-मरता वाचलेली रेशमा पठाण

‘एकता कपूरच्या मालिकांनी टेलिव्हिजनची वाट लावली…’, दिग्गज अभिनेत्याची जोरदार टिका

हे देखील वाचा